Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला

अर्धापूर प्रतिनिधी - आसना नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. राहुल रमेश आठव

जुन्या सहकाऱ्याला खिळे असलेल्या दांडक्याने मारहाण | LOKNews24
भक्तिरंगात रंगली जान्हवी कपूर
हरियाणात सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू

अर्धापूर प्रतिनिधी – आसना नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. राहुल रमेश आठवले (17)  आणि साई दशरथ चुनुरवार (18 दोघे रा.कामठा नांदेड ) अशी मृतांची नावे आहेत.
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात आसना नदी पात्रात  पोहण्यासाठी राहुल रमेश आठवले आणि साई दशरथ चुनुरवार आले. पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल आठवले बुडू लागला. त्याला वाचवायला साई गेला. मात्र, दोघेही पाण्यात बुडाले. माहिती मिळताच घटनास्थळी गोदावरी जीवरक्षक दलाचे सय्यद नुर एकबाल, कालिदास खिल्लारे, शेख लतिफ दिपक कोमावार यांनी धाव घेत शोध घेतला. काही वेळात दोघांचे मृतदेह आढळून आले. विमानतळ पोलीस, अर्धापूर पोलीस व मयतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत. आसना नदी पात्रात गेल्या काही दिवसापासून अवैध उत्खनन सुरू होते. या उत्खननामुळे नदी पात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. यात खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाला. अवैध उत्खननामुळे दोघांचे बळी गेल्याची चर्चा नागरिकांत आहे.

COMMENTS