Homeताज्या बातम्यासंपादकीय

इंडिया आघाडीची वाट बिकट

देशामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशामध्ये सत्ताधारी असलेला भाजपच्या ताकदीमध

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकिय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी
बालविवाह आणि बालमातांचे वाढते प्रमाण…
क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण

देशामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशामध्ये सत्ताधारी असलेला भाजपच्या ताकदीमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. कारण बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या रूपाने त्यांना एक मित्रपक्ष मिळाला असून, या मित्रपक्षांच्या युतीने भाजप या राज्यात सत्तेत आला आहे. भाजपच्या ताकदीमध्ये वाढ होत असतांना, दुसरीकडे इंडिया आघाडीच्या ताकद घटतांना दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रेची भूमिका घेत स्वतंत्र निवडणूका लढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मायावती यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.  खरंतर गेल्या आठवड्यात नितीश कुमार यांनी भाजपशी केलेल्या घरोब्यानंतर उद्धव यांचा सूरही बदलल्याचे दिसत आहे. गेल्या 10 दिवसांत विरोधी आघाडी इंडियाला 4 मोठे धक्के बसले होते, पंतप्रधान मोदींचे कौतुक करून उद्धव ठाकरेंनी पाचवा धक्का दिला आहे. टीएमसी प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाने इंडियाला धक्का बसला. 24 जानेवारी रोजी त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. इंडियाची पहिली बैठक जून 2023 मध्ये झाली होती, ज्यामध्ये काँग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये 10-12 जागांची मागणी केली होती. ममता बॅनर्जी बेरहामपूर आणि मालदा दक्षिण या दोनच जागा देण्यास तयार होत्या. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या या जागा होत्या. वास्तविक पाहता इंडिया आघाडीसमोर जागा वाटपाचा मुद्दा नव्हताच, तर त्यांचा मुख्य अजेंडा हा केंद्रातून भाजप सरकारला खाली खेचणे हा उद्देश होता. मात्र या सर्व बाबींना जागावाटपाचे निमित्त ठरल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर इंडिया आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेला आणि ज्याला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत असलेल्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. नुसते कौतुकच केले नाही तर, त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे की, आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो. आजही आम्ही शत्रू नाही. आम्ही तुमच्या सोबत होतो. गेल्या वेळी आम्ही तुमच्यासाठी प्रचार केला, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एकीकडे इंडिया आघाडीतून नितीशकुमार बाहेर पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील बाहेर पडतात की काय, अशी शंका निर्माण होतांना दिसून येत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून, एकीकडे मोर्चेबांधणी होत असतांना दुसरीकडे तपास यंत्रणांचे छापे मोठ्या प्रमाणावर पडतांना दिसून येत आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांना हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. मद्य घोटाळ्यानंतर आता पाणी घोटाळा समोर येत आहे. त्यामुळे ईडी केजरीवालांना देखील अटक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची पुढील वाट बिकट होतांन दिसून येत आहे. इंडिया आघाडी एकत्र येण्याऐवजी त्यातून मित्रपक्ष बाहेर पडतांना दिसून येत आहे.
काँगे्रसने भारत न्याय जोडो यात्रा काढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आलेली ही यात्रा आहे. त्यामुळे काँगे्रसचे महत्वाचे नेते या यात्रेत अडकून पडले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाची धोरणे आखतांना वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार निवडणे, तिथे उमेदवारांना ताकद देणे, या बाबी काँगे्रसकडून होतांना दिसून येत नाही. तर भाजपने आपल्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. शिवाय गेल्यावेळी जिथे भाजपचा उमेदवार पराभूत झाला ती जागा देखील यावेळेस ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोर लावल्याचे दिसून येत आहे, मात्र काँगे्रसची आणि पर्यायाने इंडिया आघाडीची ही ताकद कमी पडतांना दिसून येत आहे. 

COMMENTS