Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांजरी माथा व वाघदरी हे गाव विकासापासून कोसोदूर

सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

इस्लापूर/ किनवट तालुक्यातील जलधरा पासून आठ किलोमीटर अंतरावर अनेक वर्षापासून असलेले मांजरी माथा आणि वाघदरी हे गावे . स्वतंत्र्य मिळून 75 वर्षे

सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा धुमाकूळ
परशुराम जयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

इस्लापूर/ किनवट तालुक्यातील जलधरा पासून आठ किलोमीटर अंतरावर अनेक वर्षापासून असलेले मांजरी माथा आणि वाघदरी हे गावे . स्वतंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी पण या गावांना अनेक सुविधा पासून वंचित  रहावे लागत आहे . लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे, यापूर्वी  सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व तहसीलदार मृणाल जाधव यांनी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांना घेऊन मे 2022 मध्ये या गावची पहाणी करून मांजरी माता व वाघदरी गावाच्या नागरिकाच्या अडी अडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचे आश्वासन दिले होते,वाघदरी मांजरी माथा गावाचा महसूल आकार बंदी करून जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवणार, दर्या खोर्‍यात वसलेल्या वाघदरी, मांजरी या गावचा म्हणावा तेवढा विकास न झाल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना भौगोलिक सोयी सुविधे अभावी येथील आदिवासी नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने येथील आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वन हक्क कायदे अंतर्गत दावे मंजूर करून त्यांना जमिनी देणे व आरोग्याच्या सोयीसुविधीसह घरकुल, राशन कार्ड, पाणीपुरवठा, वीज पुरवठा अशा अनेक योजनेचा लाभ देण्यासाठी हा सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नागरिकांना भेटून आश्वासन दिले होते, त्यांनी तसा अनेक वेळा प्रयत्न सुद्धा केला होता.  प्रमाणिक अधिकारी यांची त्वरित बदली होते .या पाश्र्वभूमीवर आज किनवट येथे  नाहीत.
   दरम्यान ,आदिवासी भागातील  नागरिकांचा वेळ वाचावा व आर्थिक नुकसानही होऊ नये यासाठी गावातच कॅम्प लावून कागदपत्रे घेण्यास कर्मचार्‍यांस आदेशित करण्यात आले होते  .कॅम्प लावले आणि कागदपत्र पण नेले. तेवढ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची बदली झाल्यामुळे गावकर्‍यांना आतापर्यंत कोणतेही दाखले मिळालेले नाहीत . नागरिकांचे सर्व प्रस्ताव धूळ खात पडून आहेत की काय असे मत गावातील रहिवासी व  सामाजिक कार्यकर्ते वन समिती अध्यक्ष दत्ता नारायण भवाळे यांनी मत व्यक्त केले. आजही आमचे तेच हाल आहेत, शाळेतील शिक्षकांना रोज पायपीट  करावे लागत असते आमच्या गावातील मुला मुलीचे लग्न वेळेवर होईनात पक्का रस्ता नसल्यामुळे मुली कोणी देण्यास तयार नाहीत आणि मुली करण्यास सुद्धा तयार नाहीत त्यामुळे मुलीचा विवाह करणे सुद्धा अवघड होत आहे,अचानक माणूस बिमार पडला तर झोळी करून त्यात टाकून नेवावे लागते. अशी गंभीर अवस्था आहे. आरोग्याच्या हितासाठी असलेली म्बुलन्स कुठे असते हे नागरिकांना अद्यापही माहित नाही. दवाखान्यात येईपर्यंत तो जगतो का मरतो ? याची शाश्वती सुद्धा नसते. गेल्या पंधरा वर्षापासून या भागात एकही रस्ता नाही तसेच रस्त्यावर पूल नाहीत लोकप्रतिनिधी काय करतात. खा. हेमंत पाटील आ. भीमराव केराम ,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती. सरपंच असून या भागाचा विकास झालेला नाही. तेव्हा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे राहिलेले काम सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी करावे अशी मागणी गावातील नागरिक व तरुण मंडळी करीत आहे..
———

COMMENTS