Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम प्रभावीपणे राबवावी

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे प्रतिपादन

अहमदनगर : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम 15 नोव्हेंबर, 2023 ते 2

दैनिक लोकमंथन : भावकीतून तरुणावर जीवघेणा हल्ला
समृद्धी गायकवाडचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश
जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे

अहमदनगर : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम 15 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी, 2024 या काळात  राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करत जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.

            दूरदृष्यप्रणालीद्वारे महसुल विभागाचे उपसचिव अमित भोळे हे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की,  ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम शहरी, आणि गावपातळीवर राबविण्यात येणार असून यासाठी रुटमॅप तयार करण्यात यावा. जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणार्‍या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात.  केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स,पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी यांचाही सहभाग घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा विभागनिहाय आढावा घेऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी पॉवरपॉईंटच्या माध्यमातून मोहिमेची माहिती दिली.

COMMENTS