Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन तासांचा ब्लॉक 40 मिनिटातच आटोपला

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरू

पुणे ः मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी शुक्रवारी दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी

अर्चना गौतमचा प्रियांका गांधींच्या पीएवर गंभीर आरोप
Ashish Shelar : शिवसेनेचे स्वत:चे दात स्वत:च्या घशात गेले :आशिष शेलार | LOKNews24
नोटबंदीची वैधता आणि परिणाम

पुणे ः मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी शुक्रवारी दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले असून दोन तासांचा ब्लॉक अवघ्या 40 मिनिटातच संपवला आहे.
प्रशासनाच्या या विक्रमी कामामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्वरत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सातत्याने अपघातांच्या घटना घडत होत्या. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघात होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी होत्या.
हीच बाब लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर शुक्रवारी ग्रँटी बसविण्याचे काम हाती घेतले. या ओव्हरहेड गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. हे कॅमेरे अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर नजर ठेवतील. त्याचबरोबर बेजबाबदारपणे वाहने चालवणार्‍या वाहनचालकांवर कारवाईसाठी मदत करतील दरम्यान, ब्लॉक कालावधीत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वळविण्यात आली होती. त्यानुसार, वाहनचालकांनी वळवण पथकर नाक्यावरून पुढे पुण्याच्या दिशेने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरुन आपली वाहने वळवली. महामार्गावरील वाहनांची कोंडी होऊन नये म्हणून प्रशासनाकडून दोन तासांचे हे काम प्रशासनाने अवघ्या 40 मिनिटाच्या विक्रमी वेळेत पूर्ण केले. प्रशासनाच्या या कामाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. सध्या पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक नियमित सुरू झाली. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

COMMENTS