Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनिशिंगणापूरच्या विश्वस्तांना आता 20 ऑगस्टला पुढील तारीख

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील अनावश्यक नोकरभरती व अन्य तक्रारी बाबत देण्यात आलेल्या ४१ डी नुसारच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी  मुंबई ये

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन
पुस्तकांच्या विश्वात मुले रमली

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील अनावश्यक नोकरभरती व अन्य तक्रारी बाबत देण्यात आलेल्या ४१ डी नुसारच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी  मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांच्या समोर सर्व विश्वस्तांनी पुन्हा एकदा जाण्याचे टाळले.मुंबई येथील ऍडव्होकेट समीर जाधव यांनी धर्मदाय आयुक्ता समोर देवस्थानच्या विश्वस्ताच्या वतीने बाजू मांडली. यावेळी मुंबई धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी 20 ऑगस्ट पुढील सुनावणी साठी तारीख दिली आहे.

सविस्तर असे कि मुंबई धर्मादाय कार्यालयाने शनिशिंगणापूर देवस्थानला अनावश्यक नोकर भरती व इतर आरोपा बाबत दिलेल्या सातशे पानाच्या प्रमाणित नक्कला वर सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी देवस्थानचे विश्वस्त काय बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पण यावेळी पण शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्ताच्या वतीने मुंबई येथील ऍडव्होकेट समीर जाधव यांनी बाजू मांडली.यावेळी मुंबई धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी आता पुढील सुनावणीसाठी 20 ऑगस्ट ही तारीख दिली आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तानी झालेल्या आरोपा बाबत मागील महिन्यात १८ जुलै व २५,जुलै १ ऑगस्ट,आणि  आता ११ ऑगस्ट या चार तारखेस म्हणणे मांडले नाही. 31 जुलै रोजी धर्मदाय उपआयुक्त पुणे यांनी चौकशी केलेल्या ७००पानी प्रमाणित नकला देवस्थानला मिळाल्या असल्याने आता पुढील 20 ऑगस्टला देवस्थानचे विश्वस्त बाजू मांडण्यासाठी जातील का याबाबत चर्चा होत आहे.तसेच अनावश्यक नोकर भरती विषयी केलेल्या चौकशीचे मुद्दे ७००पानी प्रमाणित नक्कलमध्ये असल्याने यावर देवस्थानचे वकील येत्या 20 ऑगस्टला कशी बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तूर्तास तरी अजून वेट अँड वॉच परिस्थिती असल्याने येत्या 20 ऑगस्टच्या तारखेला काय होते समजेल.

COMMENTS