Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत – आ. रवी राणा 

  अमरावती प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील 12 ज

रस्त्यात उभ्या काळी-पिवळी जीपवर पाठीमागून टेंम्पो धडकला
शिर्डी शहराचे रूपडे बदलणार
गुजरातमध्ये झाले तेच मुंबईत होणार – मंत्री मंगलप्रभात लोढांचा दावा

  अमरावती प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील 12 जानेवारी 2022 रोजी राजापेठच्या उडान फुलावर युवा स्वाभिमांच्या वतीने पुतळा बसवण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज आमदार रवी राणा यांनी त्याठिकाणी अस्थायी पुतळा बसवुन त्याचे पुजन करून आरती सुद्धा करण्यात आली.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, ज्या लोकांनी हनुमान चालीसा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला त्या लोकांच्या हातातून आज शिवसेना गेली आहे. शिवसेनेचे खरे वारसदार बाळासाहेबांच्या विचाराचे खंदे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. आता फक्त उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारस राहिले आहेत शिवसेनेत राहिलेले बाकीचे मंत्री व आमदार सुद्धा आता हळूहळू शिंदे यांच्यासोबत येऊ लागले आहेत पुढील काही दिवसात फक्त आदित्य ठाकरे सचिन परब हेच उद्धव ठाकरे सोबत राहतील आणि शिवसेनेचे मुख्य भवन असलेले ठिकाण सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळणार असल्याचा दावा सुद्धा राहणार यांनी केला. 

COMMENTS