Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्यशोधक परंपरा हाच भावी क्रांतीचा आधार असेल : सचिन झगडे

श्रीगोंदा :- येळपणे ता.श्रीगोंदा येथील भगवान राऊत यांचे चिरंजीव सागर व सुभाष वाघुले अहिल्यानगर यांची कन्या अंजली यांचा विवाह अहिल्यानगर येथील आनं

नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार
बहुजनांच्या हक्काचे मारेकरी : अण्णा हजारे…
मिरजगाव परिसरात जोरदार पाऊस : सिना नदीला महापूर 
Displaying IMG-20251117-WA0026.jpg

श्रीगोंदा :- येळपणे ता.श्रीगोंदा येथील भगवान राऊत यांचे चिरंजीव सागर व सुभाष वाघुले अहिल्यानगर यांची कन्या अंजली यांचा विवाह अहिल्यानगर येथील आनंदबन पार्क येथे विवाह सत्यशोधक पद्धतीने साधेपणात आणि समाजातील दिखावू चालीरितींना छेद देत, अनावश्यक खर्चाला फाटा देत, सामाजिक संदेश देणाऱ्या स्वरूपात पार पडला.

एकीकडे हजारो रुपये सुपारी घेऊन कीर्तन करणारे कीर्तनकार स्वतःच्या मुलांचे विधी राजेशाही थाटात करत आहेत. तर दुसरीकडे महापुरुषांच्या विचारधारेतील कार्यकर्ता ‘बोले तैसा चाले‘ प्रमाणे अत्यंत साधेपणाने सत्यशोधक पद्धतीने विवाह विधी स्वतःच्या जीवनात अमलात आणत आहे हे खरोखर डोळे उघडणारी बाब आहे. समाजाने याचे अनुकरण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सत्यशोधक सचिन झगडे यांनी केले. गेल्या अनेक दिवसापासून अहिल्यानगर परिसरामध्ये सत्यशोधक विवाह करून अनेक दांपत्य वैवाहिक जीवनात प्रवेश करत आहेत. महापुरुषांच्या विचाराचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षमपणे पाऊल टाकत आहे. विवाह सोहळ्यात पारंपरिक आडपडदा, मोठे मंडप, बँडबाजा, महागडे जेवण यांसारख्या खर्चिक प्रथांना टाळण्यात आले. समान हक्क, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठ तत्त्वांचा मान राखत विवाह अल्पखर्चात पार पाडला. सत्यशोधक मार्गाने झालेल्या या विवाहाची आदर्श ठरला आहे. या विवाहातील सर्व विधी सत्यशोधक तत्त्वांचे अनुसरण करत अखिल भारतीय सत्यशोधक महासभेचे विधीकर्ते भिमराव कोथिंबिरे, संपत लांडगे यांनी पार पाडले. धार्मिक अंधश्रद्धा टाळून विवेक, समानता आणि समाजोन्नतीचा संदेश देणाऱ्या पद्धतीने विधी करून उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण केली. अनाठायी खर्च टाळून उरलेल्या रकमेतील ₹ 5000ची मदत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शैक्षणिक साधनांसाठी देण्यात आली.

COMMENTS