Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचा होणार शाखा विस्तार

कोपरगांव / प्रतिनिधी: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मवि

इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड- २०२१ मिळाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चित्रकार राहूल भालेराव यांचा सत्कार
भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने
प्राचार्याच्या मुलीसाठी फोडला प्रात्याक्षिकाचा पेपर

कोपरगांव / प्रतिनिधी: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने दरवर्षी 15% लाभांश देण्याची सुरु ठेवलेली परंपरा याहीवर्षी अबाधित ठेवली आहे.असे वक्तव्य पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचा विस्तार होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.            
पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2022-23 या वर्षाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात (दि.19) रोजी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे होते. ते पुढे म्हणाले की, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी आधारस्तंभ बनली आहे. याहीवर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि कौतुकास्पद बाब आहे. संस्थेने संपादन केलेल्या विश्‍वासाच्या बळावर ठेवींमध्ये सातत्याने होणारी वाढ  ठेवीदारांचा विश्‍वास वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिक आहे. दिनांक 31/03/2023 अखेर संस्थेकडे 36 कोटी 51 लाखाच्या ठेवी होत्या यामध्ये सातत्याने वाढ सुरुच असून आज अखेर 37 कोटीच्या ठेवी आहेत. अहवाल सालात संस्थेने 26 कोटी 84 लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण 2.39% आहे. संस्थेने एन.पी.ए. तरतूद रुपये 7 कोटी 32 लाख 64 हजारांची केली आहे. 100% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. 0% आहे. सहकार कायद्यानुसार 22 कोटी 59 लाखाची गुंतवणूक केली असून, लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून 81 लाख 15 हजार रुपयांचा नफा होवून पतसंस्था आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे सिद्ध होत आहे.अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख यांनी केले. यावेळी सर्व विषय सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सचिन चांदगुडे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, श्रीराम राजेभोसले, शिवाजी घुले, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, श्रावण आसने, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, माजी संचालक नारायणराव मांजरे, वसंतराव दंडवते, बाबुराव कोल्हे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, पंचायत समितीचे मा.सभापती अर्जुनराव काळे, शरद पवार पतसंस्थेचे व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, गौतम बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद,  आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS