पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी वाढत असतांना हिट अॅण्ड रनच्या घटनेत देखील वाढ होतांना दिसून येत आहे. पुणे पोर्शे कारनंतर या घटन

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी वाढत असतांना हिट अॅण्ड रनच्या घटनेत देखील वाढ होतांना दिसून येत आहे. पुणे पोर्शे कारनंतर या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असतांना पिंपरी गावात असाच हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. कार चालकाकडून रस्त्याच्याकडेने जाणार्या महिलेला कारने ठोकरले. कार अंगावर घातल्यानंतर कारचालक पसार झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सुदैवाने यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्यात. पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहे. ही धडक इतकी जोराची होती की यात रस्त्यावरुन चालत चाललेल्या महिला यात गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटना कधीची आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडीओनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS