Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात बर्निंग बसचा थरार..!

पुणे-सोलापूर महामार्गावरील थरारक घटना

पुणे : पुण्यात बर्निग बसची थरारक घटना घडली असून, सुदैवाने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपं

जीएसटी विभागातील उच्च पदस्थ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
केंद्राने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याला मान्यता दिल्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये जल्लोष
’जेलर’ बघण्यासाठी चेन्नई-बंगलोरमध्ये कंपन्यांना सुटी

पुणे : पुण्यात बर्निग बसची थरारक घटना घडली असून, सुदैवाने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते.
भीषण आगीची ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे .या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते. सर्वजण सुखरूप आहेत. या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या वेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. कदम वस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी गाडीचा टायर फुटला त्यानंतर गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

COMMENTS