पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असे वाटत असतांनाच तिसरी आघाडीने निवडणुकीत उडी घे
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असे वाटत असतांनाच तिसरी आघाडीने निवडणुकीत उडी घेतली आहे. यासंदर्भात पुण्यात गुरूवारी परिवर्तन महाशक्तीची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत तिसर्या आघाडीच्या वतीने 150 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे.
यावेळी बोलतांना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, समाजातील सर्वसामान्य लोक आज आमच्या सोबत असून प्रस्थापित 200 ते 250 घराणे विरुद्ध सामान्य असा हा लढा आहे. प्रस्थापित यांनी कधी सामान्य आश्वासक चेहरा पुढे येऊन दिला नाही. अनेक वर्ष आमची चळवळ केली असून सक्षमपणे आम्ही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे, असे शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यासंदर्भात बोलतांना आमदार बच्चू कडू म्हणाले म्हणाले की, सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु. आम्ही चांगले उमेदवार देणार आहेत. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसले परिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसे काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकारी युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खर्या अर्थाने कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडू म्हणाले.
स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार : राजू शेट्टी
स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आमनच्याकडे छोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. प्रस्थिपीत लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मनोज जरांगेंना सोबत घेण्याचा प्रयत्न
तिसर्या आघाडीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असून, मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचे बोलणे सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती रिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तिसरी आघाडी भक्कम होण्याची शक्यत व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS