Homeताज्या बातम्यादेश

चोरी करण्यासाठी घरात शिरला अन् तिथेच झोपला चोर

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील कानपूरमधून दरोड्याची अजब घटना समोर आली आहे. सहसा, जर चोर एखाद्याच्या घरात घुसले तर त्यांचं पहिले का

आयुध निर्मिती कारखान्यांत संपाचा इशारा
मिचाँग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यात नुकसान
चार्जशीटसाठी शासनाकडे मागितली परवानगी ; सिव्हिलमधील आग प्रकरण

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील कानपूरमधून दरोड्याची अजब घटना समोर आली आहे. सहसा, जर चोर एखाद्याच्या घरात घुसले तर त्यांचं पहिले काम घरातील मौल्यवान वस्तू चोरणं असतं आणि या वस्तू घेताच ते तिथून फरार होतात. मात्र, कानपूरमधून समोर आलेलं प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यात घरमालकाच्या पत्नीचा मृत्यू झाला होता, त्यामुळे तो घराला कुलूप लावून तिच्या अंत्यविधीसाठी बाहेर गेला होता. घरात कोणी नसल्याची माहिती चोरट्यांना मिळाली होती. मग काय, तीन चोरट्यांनी दरोड्याच्या उद्देशाने घरावर डल्ला मारला. तिन्ही चोरट्यांनी घरातून चोरी करण्याचा कट रचला होता. मात्र, यातील एका चोर दीपकने इतकी दारू प्यायली की, दारूच्या नशेत तो घरातच झोपी गेला. तर उर्वरित दोन चोरटे (सोनू आणि सुनील) घरातील मौल्यवान वस्तू लुटून पळून गेले. सकाळ होताच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झोपलेल्या चोराला दीपकला तात्काळ अटक केली. दीपकसोबत सोनूलाही पकडण्यात आलं. मात्र, सुनील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही

COMMENTS