Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ठाकरे गटाकडून नागरिकांना गाजर वाटून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

सोलापूर प्रतिनिधी - राज्याचा अर्थसंकल्प गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून नाग

खर्डा शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
गोव्यातही फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ | LOKNews24
कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज

सोलापूर प्रतिनिधी – राज्याचा अर्थसंकल्प गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून नागरिकांना गाजर वाटून निषेध व्यक्त केला आहे. ठाकरे गटाकडून मोठे गाजर दाखवून विविध फलके हातात घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. राज्याचा अर्थसंकल्प गाजर दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे फलक दाखवण्यात आले. शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 50 खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्या. मिंदे आणि भाजपचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांला न्याय नाही, कामगारांच्या हाताला काम नाही अशा विविध मुद्द्यांवरून राज्याची परिस्थिती गंभीर आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे पक्षाचा जाहीरनामा आहे. शिंदे फडणवीस सरकार जर एवढे चांगले काम करत असेल तर त्यांनी राज्यातील सर्व निवडणुका आता घ्याव्यात असे आवाहन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले आहे. 

COMMENTS