Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली स्फोटात दहशतवाद्यांकड होतेे ‘घोस्ट सिम’

फिजिकल सिमशिवाय चालायचे मेसेजिंग अ‍ॅप्सनवी दिल्ली ः दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणाच्या तपासात आता एक

हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला जन्मठेप
तमिळनाडूतून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, शस्त्रसाठा जप्त

फिजिकल सिमशिवाय चालायचे मेसेजिंग अ‍ॅप्स
नवी दिल्ली ः दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणाच्या तपासात आता एक गंभीर आणि तंत्रज्ञानाशी संबंधित बाब समोर आली आहे. या हल्ल्याशी जोडलेल्या तथाकथित ‘व्हाईट-कॉलर टेरर मॉड्यूल’मधील आरोपी डॉक्टरांनी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी ‘घोस्ट सिम’ आणि अत्याधुनिक डिजिटल युक्त्या वापरल्याचे तपासातून उघड झाले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क ठेवण्यासाठी ड्युअल-फोन पद्धतीचा अवलंब केला होता. प्रत्येक आरोपीकडे दोन ते तीन मोबाईल फोन होते. यातील एक फोन त्यांच्या स्वतःच्या नावावर नोंदणीकृत असून तो दैनंदिन वापरासाठी होता, तर दुसरा ‘टेरर फोन’ पूर्णपणे गुप्त संपर्कासाठी वापरला जात होता. या दुसर्‍या मोबाईलमध्ये फिजिकल सिम नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामसारखी मेसेजिंग अ‍ॅप्स कार्यरत ठेवण्यात आली होती. याच माध्यमातून यूट्यूबद्वारे आयईडी तयार करण्याचे प्रशिक्षण, तसेच हल्ल्यांचे निर्देश दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर किती प्रगत पातळीवर पोहोचला आहे, याचे भयावह चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील तपासानंतरच दूरसंचार विभागाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वाचे निर्देश जारी केले. त्यानुसार, मेसेजिंग प्स वापरण्यासाठी मोबाईलमध्ये क्टिव्ह सिम असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. लाल किल्ल्याजवळील कार स्फोटात तब्बल 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्थेकडे असून, दहशतवादी नेटवर्कच्या डिजिटल पायाभूत रचनेचा सखोल मागोवा घेतला जात आहे.

COMMENTS