नाशिक - आज हॉटेल पाटील वाडा,नाशिक येथे छावा क्रांतिवीर सेनेची राज्यस्तरीय आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला संपूर्ण महाराष्ट
नाशिक – आज हॉटेल पाटील वाडा,नाशिक येथे छावा क्रांतिवीर सेनेची राज्यस्तरीय आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड,अहमदनगर,पुणे,सोलापूर धाराशिव,ठाणे,सांगली, धुळे, सातारा, परभणी, हिंगोली, बुलढाणा,जळगाव,अमरावती, अकोला, नांदेड, लातूर या जिल्ह्यातून संघटनेचे राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका, शहर कार्यकारणी मधील सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर आज छावा क्रांतिवीर सेनेची ही पहिलीच राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा निहाय आजवर संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा देऊन संघटनेची पुढील वर्षभरात वाटचाल कशा पद्धतीने असेल यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी आपआपले विचार मांडले.
यात प्रामुख्याने संघटना वाढीसाठी व संघटनेच्या शाखा विस्तारासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा पुढील १५ दिवसात दौरा निश्चित करण्यात आला असून त्यांच्या नेतृत्वा मध्ये प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती देण्यात आली.
पुढील सहा महिन्यात संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण,शेतकरी,सहकार, शिक्षण,कामगार या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अन्याय होत असेल सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असेल त्या ठिकाणी आक्रमकपणे आंदोलन करण्याची रणनीती बाबत ठराव मंजूर करण्यात आला.
महत्वाचे म्हणजे संघटनेचे १० वे राष्ट्रीय महाअधिवेशन शिर्डी जिल्हा नगर या ठिकाणी घेण्यात यावे असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत छावा क्रांतिवीर सेना स्वबळावर किंवा समविचारी पक्षाशी युती करून ज्या मतदार संघामध्ये छावा क्रांतिवीर सेनेची ताकद आहे अशा दहा ठिकाणी आढावा घेवून विधानसभेच्या जागा लढविण्याबाबत देखील ठराव करण्यात आला.
वरील विविध विषयांना एकमताने ठराव मंजूर करत संघटनेची राज्यस्तरीय बैठक खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात छावा क्रांतिवीर सेनेच वादळ हे आपण प्रत्येक जिल्ह्यात ग्राउंड लेव्हल पर्यंत निर्माण करण्यासाठी ताकतीने कामाला लागावे, महाराष्ट्रात शेतकरी,कामगार मराठा आरक्षण या विषयावर आक्रमकपणे आंदोलन करत जनसामान्यांना न्याय देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आपआपल्या जिल्ह्यात आंदोलने मोर्चे काढून न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. संघटनेचे दहावे राष्ट्रीय महाअधिवेशन पार पाडत असताना संघटनेची बांधणी आणखी भक्कम व्हावी यासाठी आपण सर्वांनी आपापल्या भागात संघटनेची शाखा निहाय पदाधिकारी निवड या मोठ्या प्रमाणात करायची आहे सर्व पदाधिकारी संघटनेची ताकद संघटनेचे गतवैभव वाढविण्यासाठी ताकतीने प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त केला. निवडणुका आपल्याला जर ताकतीने लढायच्या असतील तर त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करावी लागेल, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपले योगदान द्यावे लागेल त्याच वेळी जनमानसात संघटनेबद्दल आपुलकी विश्वास निर्माण होईल अशी भावना निर्माण करावी लागेल.पुढील काळात छावा क्रांतिवीर सेनेचे जाळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी भावना व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघटनेचे प्रदेश महासचिव शिवाजी मोरे,युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज जराड पाटील,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष विशाल गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर,नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे,नवनाथ वैराळ, आय टी विभाग प्रमुख किरण बोरसे,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,मुंबई कोकण विभाग,विदर्भ विभागीय अध्यक्ष व सर्व जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS