Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक हे गुणवंतच – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

राज्य उत्पादन शुल्क विभाग सामाजिक संस्थांच्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांना कॉम्पुटर, टीव्ही, टॅब वितरित

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभाग, परनॉड रिकार्ड इंडिया व मुस्कान ड्रीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा व दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परि

उदयनिधी स्टॅलिनच्या अडचणी वाढल्या
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
नगरमधून तीन अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभाग, परनॉड रिकार्ड इंडिया व मुस्कान ड्रीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा व दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ शाळांना डिजिटल शिक्षणासाठी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आई कै. सुशिला सूर्यवंशी (सेवा निवृत्त मुख्याध्यापिका) व वडील कै.नामदेवराव सूर्यवंशी (सेवा निवृत्त गट विकास अधिकारी) यांच्या स्मृति प्रित्यर्थ जिल्हा परिषद येथील कार्यक्रमात कॉम्पुटर, टीव्ही, टॅब वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग एच.डी. तडवी, पोलिस अधीक्षक (उत्पादन शुल्क) शशिकांत गर्जे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव, परनॉड रिकार्ड इंडियाचे हेड प्रशांत त्रिपाठी, नाशिक प्लांट हेड सविंदर सिंग, मनोज पचोरी आदि उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमात उपस्थित असतांना माझा स्वतःचा जीवनपट डोळ्यांपुढे आला असून माझा देखील अशाच शालेय कार्यक्रमात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता तिथूनच भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याची मला प्रेरणा मिळाली, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे खाजगी शाळांच्या तुलनेत निश्चितच गुणवंत असतात, माझी दिवंगत आई सुशिला सूर्यवंशी ही जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका होती व वडील नामदेवराव सूर्यवंशी हे सेवा निवृत्त गट विकास अधिकारी होते त्यामुळे जिल्हा परिषद शाळांविषयी एक वेगळी आपुलकी मनामध्ये आहे, जिल्हा परिषदेचे शिक्षक हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतात यावेळी भौतिक सुविधांच्या विशेष अडचणी जाणवतात त्यामुळे या विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देण्याच्या उद्देशाने आज सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना भविषयावेधी शिक्षण द्यावे असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्व देत नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने मॉडेल स्कूल ही संकल्पना राबवण्यात येत आहे, डिजिटल शिक्षणातुन जागतिक ज्ञानाची दारे ही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उघडतील त्यासाठी संसाधनांचा सुयोग्य वापर हा जिल्हा परिषदेच्या शाळांनी करावा, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी व्यक्त केले. आम्ही ज्या भागात काम करतो त्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा उद्देश असतो राज्य उत्पादन शुल्क विभाग व नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील शाळांना मदत करता आल्याचा आम्हाला आनंद आहे असे परनॉड रिकार्ड इंडियाचे नाशिक प्लांट हेड सविंदर सिंह यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असे असे परनॉड रिकार्ड इंडियाचे हेड प्रशांत त्रिपाठी यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते.

COMMENTS