केज प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये केज शहरातील बीड -आं

केज प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये केज शहरातील बीड -आंबेजोगाई रोडवरील शिक्षक कॉलनी समोरील जीवन शिक्षण उच्च माध्यमिक विद्यालयच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून या महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मारुन भाई इनामदार, संस्थेचे सदस्य तथा बंसल क्लासचे प्रमुख यासीनभाई इनामदार, प्राचार्य दत्तात्रेय हंडीबाग, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, मुख्याध्यापक विनायक ठोंबरे, विज्ञान शाखेचे प्रमुख आवळे सर, कदम सर, वस्तीग्रह अधीक्षक शिंदे सर, बीएससी विभागाचे साखरे सर, बंसल क्लासचे मुंडे सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संस्थेचे सचिव हारुनभाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कारण विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन करून महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लावला आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे गुणवंत विद्यार्थी :- प्रथम अश्विनी महारुद्र गिरी आणि अदनान मुबिन इनामदार द्वितीय ऋतुजा सतीश शिंदे तृतीय तहूरा रशीदमीया इनामदार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
COMMENTS