विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकांकडून जबर मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकांकडून जबर मारहाण

गोंदिया मध्ये संतापजनक प्रकार समोर

गोंदिया प्रतिनिधी  : गोंदिया(Gondia) मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शारीरिक सरावादरम्यान दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारह

नाशिकमध्ये फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात
राहुरी फॅक्टरी परिसरात आढळला परप्रांतीय कामगाराचा मृतदेह
नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप l DAINIK LOKMNTHAN

गोंदिया प्रतिनिधी  : गोंदिया(Gondia) मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शारीरिक सरावादरम्यान दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला दोन शिक्षकांने बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत(Progressive School) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले तर दुसऱ्याने माफीनामा लिहून दिला आहे. पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तेजेश्वर तुरकर आणि लालचंद पारधी या दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS