Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निफाड नगरपंचायत चा आडमुठेपणा, करवाढीच्या मुद्द्यावर उपोषणकर्ते ठाम

निफाड : गेली दोन दिवसांपासून पाणीपट्टी व इतर करवाढ    मागे घेण्यासाठी उपोषण सुरू आहे परंतु अनेकदा मुख्य अधिकारी अमोल चौधरी यांनी भेट घेतली व. उपो

खर्डा येथे युवकाचा निर्घृण खून
अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्‍यांचे वीजबिल झाले कोरे
खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

निफाड : गेली दोन दिवसांपासून पाणीपट्टी व इतर करवाढ    मागे घेण्यासाठी उपोषण सुरू आहे परंतु अनेकदा मुख्य अधिकारी अमोल चौधरी यांनी भेट घेतली व. उपोषण मागे घ्यावे ह्यासाठी प्रयत्न केले,उपोषणकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत, गावातील सर्व थरातून ह्या उपोषण ला पाठिंबा मिळत आहे,कारण ही करवाढ  नागरिकांचे कंबरडे मोडणारा आहे,निफाड मध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तरीही पाणी पट्टी झालेली वाढ ही अंन्याय कारक आहे म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येऊन नागरिक बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे,आंदोलन सुरू असताना विघ्न संतोषी लोकांनी त्यात आपली चार चाकी वाहने आडवी लाऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला परंतु स्वतः निफाड पोलिस स्टेशनचे पी आय बापू महाजन व कर्मचारी पोलिस ह्यांनी सदर वाहने स्वतः चालवीत अडथळा दूर करून पुढील वाद होता होता वाचले, पाहिल्या दिवशी आंदोलन जेवढे जोमात आहे तेवढेच दुसऱ्या दिवशी देखील तेवढंच त्रीव राहिले उपोषणात पुरुषांरोबर महिला नगरसेवक आणि इतर महिलांची संख्या अधिक आहे,

निफाडचे नाव मोठे परंतु ह्या भरघोस कराच्या दर वाढ मुळे गाव भिक घालेना नगर पंचायत जेऊ देईना अशी अवस्था झाली आहे,आज दुसऱ्या दिवशी निफाडचे डी वाय एस पी पालवे साहेब ,पी आय बापू महाजन,नगरपंचायत चे मुख्य अधिकारी आणि पाच उपोषणकर्ते ह्यांनी बैठक घेऊन शांततेच्या मार्गाने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु उप नगराध्यक्ष व नगसेवक ह्यांनी आडमुठे धोरण अवलंबिले म्हणून बैठकीत निर्णय होऊ शकला नाही,त्यामुळे उपोषणकरत्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन उद्या निफाड बंदचे आवाहन केले आहे,

   दरम्यान उपोषणाच्या पाहिल्या दिवशी शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख आदरणीय जयंत दिंडे ह्यांची देखील भेट लाभली त्यांनी उपोषणकरत्यांना योग्य ते मार्गदर्शन केले,निफाडचे भारतीय जनता पक्षाचे संजय गाजरे,जिल्हा प्रमुख शंकरराव वाघ,नगर सेवक जावेद शेख,बापू कुंदे,नगर सेविका रुपाली रंधवे,विक्रम रांधवे,मुकुंद होळकर व नगर सेविका होळकर ताई, बाळासाहेब पेंढारकर,सचिन खडताले,बापू कापसे हयांचे मार्गदर्शनाखा ली , उद्या निफाड बंदचे आवाहन केले आहे

COMMENTS