Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संघर्ष योध्दा स्व. बबनरावजी ढाकणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली – आ. मोनिका राजळे

पाथर्डी प्रतिनिधी - अकोले सोसायटीचे चेअरमन, पाथर्डी पंचायत समितीचे सभापती ते केंद्रीय उर्जा मंत्री पदी झेप घेणारे,पाथर्डी-शेवगांव मतदारसंघाच्या ज

 श्रीरामपूर मध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक
शिर्डीतील हॉटेल व्यवसायिकाची 40 लाखांची फसवणूक
विद्युत पुरवठा खंडीत केल्याने राहुरी तालुक्यातील ग्रामस्थांचा संताप

पाथर्डी प्रतिनिधी – अकोले सोसायटीचे चेअरमन, पाथर्डी पंचायत समितीचे सभापती ते केंद्रीय उर्जा मंत्री पदी झेप घेणारे,पाथर्डी-शेवगांव मतदारसंघाच्या जडण घडणीसाठी महत्वपूर्ण योगदान देण्याबरोबरच राज्याच्या राजकरणात धुरंदर पणे विरोधी पक्ष नेता, विधानसभा उपाध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मा. शरदरावजी पवार साहेबांच्या पुलोद आघाडीचे नेते व बांधकाम राज्यमंत्री, दुग्धविकास कॅबीनेट मंत्री, मतदारसंघाचे १६ वर्ष आमदार, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री, अशी उत्तुंग पदे भुषवून समाजाची, राज्याची व देशाची त्यांनी सेवा केली.

                कोणताही राजकीय वारसा नसतांना स्वकर्तुत्वावर राजकारण व समाजकारण करीत असतांना एकलव्य शैक्षणिक संस्था, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना निर्मिती, वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना वाढीस योगदान या वाटचालीत अनेक संघर्ष करीत त्यांनी अनेक आंदोलने,मोर्चे काढून लोकांसाठी जीवन समर्पीत केले. पाथर्डी-शेवगांव तालुक्यास वीज मिळावी म्हणून राज्याच्या विधानसभेच्या गॅलरीतून उडी घेवून पत्रके फेकून राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले,१९७२ दुष्काळावर मात करतांना थेट पंतप्रधान इंदीरा गांधीना अकोला धायतडकवाडीत आणणारे नेतृत्व १९७२ च्या दुष्काळात,ज्यांनी मतदारसंघासाठी योगदान दिले त्या मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांचा पाथर्डी शहरात पुतळा उभारणी, वांबोरी चारीसाठी संघर्ष,अन्यायकारी कोपरे धरणाच्या विरोधाचा लढा, अनेक अडचणी व संघर्षातून शेवगांवच्या पूर्व भागात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती, ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांचे संघटन, व त्यांच्या उन्नतीसाठी लढा, डी.एड, बेरोजगारांसाठी शासना विरोधात पायी लॉगमार्च मोर्चा अशा अनेक संघर्षातून त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले.

                मतदारसंघ व समाजासाठी लोकाभिमुख काम करण्याबरोबरच राज्य व देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे, उत्तुंग नेतृत्व आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने ॲड. प्रतापकाका ढाकणे व त्यांच्या कुटुंबीयावर जो दुखा:चा डोंगर कोसळला त्या दु:खातून त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो,त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक धुरंदर नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती देवो ही प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली.

COMMENTS