मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या कलचाचण्यांनी पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवल्यानंतर सोमवारी उघडलेल्या शेअर बाजारात मोठी

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या कलचाचण्यांनी पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवल्यानंतर सोमवारी उघडलेल्या शेअर बाजारात मोठी तेजी बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. मात्र कलचाचण्यांनंतर सोमवारी शेअर बाजार उघडताच मोठी उसळी दिसून आली. निफ्टीच्या निर्देशांकात 3.58 टक्क्यांची तर सेन्सेक्समध्ये 3.55 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 2,621.98 अकांची वाढ होऊन निर्देशांक 76 हजारांच्याही पुढे गेलेला पाहायला मिळाला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 76 हजारांचा टप्पा पार केला. तसेच निफ्टीमध्येही 807.20 अकांची वाढ होत निर्देशांक 23,337 च्याही पुढे गेला. नंतर तो 23,000 वर स्थिर असल्याचे दिसले.
COMMENTS