शेअर बाजार कोसळला ; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार कोसळला ; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान

मुंबई/प्रतिनिधी : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत असून, गुरूवारी रशियाने आक्रमण करताच, शेअर बाजार कोसळतांना दिसला. से

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभू यांची उलट-तपासणी
विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !
केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधी : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत असून, गुरूवारी रशियाने आक्रमण करताच, शेअर बाजार कोसळतांना दिसला. सेन्सेक्स 2,700 अंकांनी किंवा 4 टक्क्यांहून अधिक घसरत 55 हजार अंकांच्या खाली आला. त्याचवेळी निफ्टीही 750 अंकांच्या घसरणीसह 16,100 अंकांच्या पातळीवर आला आहे. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
गुरूवारी बीएसई निर्देशांकातील शीर्ष 30 समभाग रेड झोनमध्ये आहेत. सर्वांत मोठी घसरण बँकिंग आणि आयटी समभागांना कारणीभूत ठरली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर जवळपास सात टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर एशियन पेंट, महिंद्रा ण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल, बजाज फिनसर्व्ह, मारुती यांच्या समभागातही चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बाजारात विक्रीचे वातावरण असे आहे की बीएसई निर्देशांकातही सर्वांत कमी दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी अमेरिकेचे शेअर बाजारही मोठ्या घसरणीसह बंद झाले. त्याचा परिणाम गुरुवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजारात दिसून आला. सलग सहा सत्रांच्या घसरणीनंतर आज सातव्या सत्रातही सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. बीएसईचा 30 शेअर्सचा महत्त्वाचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 9.15 वाजता 1813 अंकांनी घसरून 55,418 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही निर्देशांक इतर आशियाई बाजारांप्रमाणेच बहुतेक वेळा सकारात्मक श्रेणीत राहिले. कारण, युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्करी हालचालींनंतर रशियावर पाश्‍चात्य निर्बंधांमुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भूमिका कमी होईल आणि युद्धाची भीती दूर होईल अशी गुंतवणूकदारांना आशा होती.

COMMENTS