Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार कोसळला

गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रचंड तेजी होती, मात्र बुधवारी शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल

शेअर बाजार पुन्हा कोसळला
शेअर बाजार तेजीनंतर कोसळला
शेअर बाजार पुन्हा कोसळला

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रचंड तेजी होती, मात्र बुधवारी शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. काल सेन्सेक्स-निफ्टी प्रचंड घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समध्ये आज 1,000 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टीमध्येही 300 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक आज 1.5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत असून एकूण बाजार भांडवलापैकी 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
शेअर बाजारात चौफेर घसरण दिसत आहे. इडए सेन्सेक्स 1,013.22 अंकांनी किंवा 1.52 टक्क्यांनी घसरून 65,446.09 च्या पातळीवर आला.  बँक निफ्टीमध्येही जबरदस्त घसरण दिसून येत आहे आणि आज तो 800 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. बँक निफ्टी 863 अंकांच्या किंवा 1.89 टक्क्यांच्या घसरणीसह 44,729 च्या पातळीवर आला आहे. आजच्या प्रचंड घसरणीत, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे आणि त्यांच्या भांडवलात 5 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. कालचे बाजार भांडवल 306.80 लाख कोटी रुपये होते, ते आज 301.69 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

COMMENTS