Homeताज्या बातम्यासंपादकीय

निकालापूर्वीच ठिणगी

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्पा बाकी असून, 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर  4 जूनरोजी निकाल हाती येणार आहे. मात्र त्

राष्ट्रवादीतील खडाखडी
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
कलचाचण्यांचा निष्कर्ष

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्पा बाकी असून, 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर  4 जूनरोजी निकाल हाती येणार आहे. मात्र त्यापूर्वीच महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. निकाल कुणासाठी अनुकूल आणि कुणासाठी प्रतिकुल राहणार याचा फैसला 4 जून रोजीच होणार असला तरी, राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते छगन भुजबळ यांनी आताच भाजपला इशारा देत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला किमान 80-90 जागा मिळाव्यात अशी मागणी करून भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू होता. नाशिकमध्ये खुद्द छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी तयारी होते, मात्र शेवटच्या टप्प्यात ही जागा शिंदे गटाला मिळाली आणि या जागेवर पुन्हा एकदा हेमंत गोडसे निवडणुकीसाठी उभे राहिले. लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असतांना उमेदवारी जाहीर होण्याचा खेळ महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे उमेदवारांना तयारी करण्यासाठी वेळ मिळाल्या नसल्याच्या तक्रारी देखील होत्या. त्याचबरोबर हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांची उमेदवारी बदलण्यात आली होती. त्यामुळे महायुतीमध्ये नेमक्या कोणत्या जागेवरून कुणी लढायचे, उमेदवार कोणता असेल, याची कोणतीही शेवटची चर्चा झालेली नव्हती. जागावाटपासंदर्भात अनेक वेळेस महायुतीचे नेते राजधानीत दाखल झाले होते. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात या उमेेदवारी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला, शिंदे गटाला आणि अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज विविध पक्षांकडून आणि राजकीय विश्‍लेषकांकडून वर्तवण्यात येत असला तरी, महायुतीच्या जागा कमी होण्याचा अंदाजच सर्वांनी वर्तवला आहे.

त्यामुळे जर शिंदे गट आणि अजित पवारांच्या बहुतांश उमेदवारांचा पराभव झाल्यास महायुती भक्कमपणे राहील का, यावर प्रश्‍न उपस्थित होत आहे.  त्यातच भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून विधानसभेत चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी पक्षाच्या बैठकीत नेतृत्वाला आठवण करून दिली. राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपच्या नेतृत्वाबरोबर सविस्तर चर्चा झाली होती. विधानसभेच्या 80 ते 90 जागा देण्याचा शब्द तेव्हा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने आम्हाला दिला होता. याची आठवण आमचे नेते अजित पवार यांना करून दिली. विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यामुळेच जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. वास्तविक पाहता जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 80 जागा दिल्यास, तर शिंदे गटाला किती जागा देणार आणि भाजप किती जागा लढवणार, यासंदर्भात अजून कोणतीही प्राथमिक माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये पुन्हा एकदा खटके उडू शकतात. कारण शिंदे गट देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 2019 मध्ये जितक्या जागा आम्ही लढवल्या होत्या, तितक्या जागा आम्हाला द्या अशी मागणी शिवसेनेने केल्यास त्यात वावगे असे काही नाही, मात्र तितक्या जागा भाजप सोडणार नाही. किमान 170-150 जागा तरी भाजप लढेल, यात शंका नाही. अशावेळी भाजपचे मित्रपक्ष यांच्या वाटेला किती जागा येतील, याचे उत्तर आगामी काळच देईल, मात्र तोपर्यंत महायुती भक्कमपणे असायला हवी. कारण सरकारने जरंडेश्‍वर कारखान्यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. आणि हा कारखाना अजित पवारांशी संबंधित असल्यामुळे हा अजित पवारांना बाहेर न पडण्यासाठी अप्रत्यक्ष इशारा तर नव्हे ना, अशीही चर्चा आता रंगतांना दिसून येत आहे.

COMMENTS