सांगली प्रतिनिधी - सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेशोत्सवाचा आज नववा दिवस आहे. 10 दिवस साजरा केला जाणाऱ्या या उत्सवात लहान मोठे असो

सांगली प्रतिनिधी – सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेशोत्सवाचा आज नववा दिवस आहे. 10 दिवस साजरा केला जाणाऱ्या या उत्सवात लहान मोठे असो आनंदाने भाग घेतात. ठिकठिकाणी सातव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. डीजेच्या दणक्यात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना त्रास होतो. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे दोन जणांचा जीव गेल्याची दोन घटना घडल्या आहे. पहिली घटना सांगलीच्या कवठेएकंद या ठिकाणी घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेखर सुखदेव पावशे (32) तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मयत शेखर पावशे यांचा हृदयरोगाचे निदान झाल्यामुळे नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. घरातील सदस्यांनी त्याला जाऊ नको सांगून देखील तो मिरवणुकीत गेला. गावात डीजे लावून गणपती विसर्जनाची मिरवणूक काढत असताना डीजेच्या दणदणाटाने शेखरला रात्री अस्वस्थ वाटू लागले आणि तो कसाबसा घरी आला आणि घरातच कोसळून पडला आणि बेशुद्ध झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
COMMENTS