Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमधील परिस्थिती चिघळली

हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू

मणिपूर- ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्याने राज्यातील बिगर आदिवासी आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून

निर्घृण खून! 9 जणांनी मिळून तरुणावर केले तब्बल 35 चाकूचे वार | LOKNews24
भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत्न म्हणजे कोलाज संभ्रमाचे वर्तमान
पंतप्रधान मोदींची 7 मे रोजी अहमदनगरमध्ये सभा

मणिपूर- ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्याने राज्यातील बिगर आदिवासी आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. राज्यात ५३ टक्के असलेल्या मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मुद्यावर हा वाद भडकला आहे.

मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी बुधवारी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर यांनी विष्णूनगर तसेच चुराचांदपूर जिल्ह्यात मोर्चा आयोजित केला होता. यात मोठ्या संख्येने युवक सामील झाले होते. त्यावेळी विष्णूपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या गटाशी मोर्चेकऱ्यांची चकमक उडाली त्यातून एका समुदायाची घरे जाळण्यात आली. राजधानी इंफाळसह राज्यभर या हिंसेचे लोण पसरले. अखेर लष्कराला पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS