Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदन टोळीचा सिरसाळा पोलिसांनी केला पर्दाफाश

सिरसाळा प्रतिनिधी - 10 किलो चंदनासह 2 पुष्पाराज पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून चंदन गाभा आणि मोटारसायकल असा हजारोच्या ऐवज पोलिसांन

दरवाजा उघडता उघडता…पायाजवळची पर्स झाली गायब
महसुल सप्ताहानिमित्त अंबाजोगाई तहसील कार्यालयात माजी सैनिकांशी संवाद
शेअर बाजार सलग दुसर्‍या दिवशी कोसळला

सिरसाळा प्रतिनिधी – 10 किलो चंदनासह 2 पुष्पाराज पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून चंदन गाभा आणि मोटारसायकल असा हजारोच्या ऐवज पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात  सपोनी रविंद्र बालाजी यांच्या फिर्यादीवरून गुरंन 51/2023 कलम 379,34 भादवी सह कलम 41,42,26 (एफ) भा. व.अधीनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिरसाळा परिसरात मंगळवार दि 4 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कुंडी फाटा येथे 2 इसम चंदन गाभा सह चोरटी वाहतूक करीत असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता लातूर जिल्ह्यातील  साकुळ ता-शिरूर अनंतपाळ येथील प्रदिप किसन ईटकर (वय 25) व राहुल राम इटकर (वय 22) हे दोघे विना परवाना चंदन गाभा विनापरवाना चोरटी वाहतूक करताना आढळून आले.या दोघांकडे 10 किलो 500 ग्राम तासलले चंदन गाभा लाकूड ज्याची किंमत 26 हजा 250 रु आणि 40 हजार रु किमतीची मोटार सायकल असा एकूण 66 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोहे शेंगुळे पोहे जेटेवाड करत आहे

COMMENTS