भाविकांच्या श्रद्धेचा ओघ वाढला; 4 किलो 411 ग्रॅम चांदी व 118 ग्रॅम सोने दानमाहूर । प्रतिनीधीमहाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व प

भाविकांच्या श्रद्धेचा ओघ वाढला; 4 किलो 411 ग्रॅम चांदी व 118 ग्रॅम सोने दान
माहूर । प्रतिनीधी
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व पूर्णपीठ म्हणून ओळख असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुका देवी संस्थानसाठी डिसेंबर महिना उत्पन्नाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला आहे. देशभरातून येणार्या भाविकांच्या वाढत्या श्रद्धेचा प्रत्यय देत अवघ्या एका महिन्यात संस्थानला 1 कोटी 14 लाख 20 हजार 899 रुपये रोख उत्पन्न, तसेच 4 किलो 411 ग्रॅम 780 मिली चांदी व 118 ग्रॅम सोने दान स्वरूपात प्राप्त झाले आहे. ही माहिती संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली.
डिसेंबर महिन्यात विशेष पूजा, उत्सव, तसेच सुट्टीच्या कालावधीमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. या कालावधीत संस्थानच्या विविध माध्यमांतून मिळालेले उत्पन्न व दान यामुळे आर्थिक बाबतीत हा महिना विक्रमी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. 11 दानपेट्यांची पारदर्शक मोजदाद दि. 7 जानेवारी (बुधवार) रोजी श्री रेणुका देवी संस्थानच्या कार्यालयात संस्थानच्या एकूण 11 दानपेट्या उघडून मोजदाद करण्यात आली. या मोजदादीतून 25 लाख 32 हजार 398 रुपये रोख रक्कम, 96 ग्रॅम 500 मिली सोने, सोन्याच्या 47 नथा, तसेच 2 किलो 210 ग्रॅम चांदीचे दागिने प्राप्त झाले. दानपेट्यांची मोजदाद अत्यंत पारदर्शक पद्धतीने व व्हिडिओ चित्रीकरणात करण्यात आली. भाविकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी संस्थान प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया नियमबद्धपणे राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. विविध माध्यमांतून झालेले उत्पन्न गेल्या 30 दिवसांत संस्थानला खालीलप्रमाणे उत्पन्न प्राप्त झाले – संस्थान कार्यालयाच्या देणगी काउंटरवरून : 38 लाख 51 हजार 224 रुपये साडी-पातळ विक्रीतून : 24 लाख 34 हजार 530 रुपये ऑनलाईन देणगीतून : 26 लाख 2 हजार 747 रुपये दानपेटीतून : 25 लाख 32 हजार 398 रुपये या सर्व बाबींच्या एकत्रित मोजणीनंतर संस्थानचे एकूण रोख उत्पन्न 1 कोटी 14 लाख 20 हजार 899 रुपये इतके झाले आहे. सोने-चांदीच्या दानातही वाढ भाविकांनी रोख देणगीबरोबरच मौल्यवान धातूंचेही मोठ्या प्रमाणात दान केले आहे. दानपेटीतून प्राप्त 96 ग्रॅम 500 मिली सोने व पावतीवर प्राप्त 21 ग्रॅम 510 मिली सोने, असे एकूण 118 ग्रॅम सोने संस्थानला दान स्वरूपात मिळाले. तसेच दानपेटीतून 2 किलो 210 ग्रॅम चांदी आणि पावतीवर प्राप्त 2 किलो 201 ग्रॅम 780 मिली चांदी, अशी एकूण 4 किलो 411 ग्रॅम 780 मिली चांदी संस्थानच्या तिजोरीत जमा झाली आहे. संस्थान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या उत्पन्नाचा उपयोग भाविकांसाठी सुविधा वाढविणे, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, तसेच मंदिर परिसराच्या विकासकामांसाठी करण्यात येणार आहे. भाविकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थान कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सदर दानपेट्यांची मोजदाद तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, दुर्गादास भोपी, बालाजी जगत, संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे व सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS