Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेत बुधवारी मोठा राडा बघायला मिळाला. शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे. शिवस

वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी
कोलकात्यात कनिष्ठ डॉक्टरांचा संप सुरूच
नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारले.

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेत बुधवारी मोठा राडा बघायला मिळाला. शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे. शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे.


मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने कब्जा केला आहे. बुधवारी राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केला आहे. शिंदे गटाने पक्ष कार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे. शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर ठाकरे गट आमने सामने आले आहेत. त्यानंतर पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. शिंदे गटाने पालिकेच्या पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

COMMENTS