विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले, हे योग्यच झाले. जयंत पाटील हे
विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले, हे योग्यच झाले. जयंत पाटील हे सभागृहाचे ज्येष्ठ नेते असतानाही आणि सभागृह हे सर्वोच्च मर्यादा पाळण्याचे लोकशाही मंदिर असल्यामुळे या ठिकाणी आदबीने बोलणं – ज्याला संवैधानिक भाषा म्हटली जाते – त्याच भाषेत बोललं गेलं पाहिजे, हा मानक आहे. परंतु अधून-मधून जयंत पाटील हे आपल्या सत्तेच्याच मस्तीत असल्यासारखे बोलत असतात. महाविकास आघाडीची सत्ता असताना नरहरी झिरवळ हे सभागृहाचे उपाध्यक्ष होते. परंतु, नियमित अध्यक्ष नसल्यामुळे त्यांना सभागृहाचे अध्यक्ष असल्याचे अधिकार प्राप्त होते. अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य असलेले नरहरी झिरवळ यांनी अत्यंत संघर्षमय काळात सभागृह नियमानुसार चालवलं. त्यांच्या नियमांची जरब महाविकास आघाडीच्या सरकार घालवल्यानंतर आलेल्या शिंदे – भाजप सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार बनून राहिलेली आहे! अशा नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांची त्यावेळीही जीभ घसरली होती, आणि ते म्हटले होते की आदिवासी असूनही झिरवळ यांनी ‘बरे’ काम पाहिले. त्यांच्या या अभिप्रायातच जातीय मानसिकता डोकावत होती.
नरहरी झिरवळ यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ते पाहता त्यांच्या कामकाजाने सभागृह प्रभावी झाले होते. परंतु एवढ्या उत्तम आणि दर्जेदार कामाला जयंत पाटील यांनी फक्त बरेच तर म्हटलेच, परंतु, त्याबरोबर त्यांच्या जातीचाही उल्लेख त्यांनी केला. यामुळे जयंत पाटील हे सरंजामी व्यवस्थेचे कडवे प्रतीक असल्याचे सभागृहात आजही दिसून आले, असे म्हणावेच लागेल. जयंत पाटील यांचे सभागृहात वावरणे आणि सत्तेत असतानाही वावरणे, या बाबींचे जर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनुषंगाने निरीक्षण केले तर त्यांच्यामध्ये एक सरंजामी कडवेपणा कायम दिसत असतो. वास्तविक ते ज्या विभागातून प्रतिनिधित्व करतात त्या विभागात अनेक जात्यांधशक्तींना वाढू देण्यासही त्यांनी वाव दिलेला आहे; ही बाब महाराष्ट्रापासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे एका बाजूला पुरोगामी वाचावा आणायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भोवती किंवा आपल्या क्षेत्रातच प्रतीक अमित व प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू द्यायचं अशा दुटप्पी धोरणामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे नेहमीच महाराष्ट्राला सांशक वाटलेले आहे.
तर, दुसऱ्या बाजूला सभागृहात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच जमीन घोटाळ्याचे आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीरपणे केले. त्यामुळे काहीसे बॅक फुटवर आलेले सरकार आपल्यावरची बाजू पलटवण्याच्या प्रयत्नात निश्चित होते. या बाबीला जयंत पाटील यांनी आयती संधी रूपांतरित करून दिली, असे म्हणावे लागेल. कारण सभागृहाच्या मानसन्मानाच्या अनुषंगाने कोणाच्याही विरोधात अपशब्द निघून नये, ही मर्यादा पाळायलाच हवी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेकलेल्या प्रकरणामुळे सभागृहात टोकाच्या काहीतरी बाबी समोर येतील अशी शक्यता सकाळपासूनच वाढली होती. अर्थात याच दरम्यान भास्कर जाधव यांना दिशा सालीयन प्रकरणात बोलू द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. यासाठी सभागृहाचे सत्ताधारी बाकावरचे १४ सदस्य बोलल्यानंतर विरोधी बाकांवरून किमान दोन सदस्यांना तरी बोलू द्यावं, असा आग्रह झाला आणि यातूनच सभागृहात हा पुढचा सगळा नाट्यमय हंगामा झाला. एकंदरीत पाहता सभागृहाचे गांभीर्य नष्ट होतेय का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही!
COMMENTS