अहमदनगरमधील 87 हजारजणांना द्यायचाय दुसरा डोस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमधील 87 हजारजणांना द्यायचाय दुसरा डोस

मनपासमोर लसीकरणाचे आव्हान; ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी वाढली

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरामधील सुमारे 87 हजार नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसच घेतलेला नाही. ’ओमायक्रॉन’ या नवीन व्हेरियंटचे संक

तिरुपतीला पाच किलो सोन्याची तलवार अर्पण DAINIK LOKMNTHAN
शेतकरी लाँग मार्चला भाकपचा सक्रीय पाठिंबा
तुळजाभवानी देवीचा पलंगाच्या प्रवासाला परवानगी मिळावी, भाविकांची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरामधील सुमारे 87 हजार नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसच घेतलेला नाही. ’ओमायक्रॉन’ या नवीन व्हेरियंटचे संकट घोंगावत असताना शहरात मात्र लसीकरणासाची गती कमी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शहरात अद्यापही 86 हजार 843 नागरिक करोनाच्या दुसर्‍या लसीपासून दूर आहेत. दुसर्‍या डोसचे सुमारे 58.52 टक्के एवढेच काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ओमायक्रॉनच्या चर्चेमुळे मनपा लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे.
नगर शहरासह जिल्ह्यामध्ये सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरण वाढविण्यासाठी या अगोदर अनेक वेळेला बैठका झाल्या, नियोजन झाले. मात्र त्याचे फलित काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. नगर शहरात करोना कमी झाल्याने करोनाबाबतची भीती नागरिकांच्या चेहर्‍यावर कमी झाल्याचे दिसत आहे. मास्कच्या वापराबाबतही नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढला आहे. नगर शहरात करोनाचा वेग मंदावला आहे. काही महिन्यांपासून शहरातील दैनंदिन रूग्ण संख्या घटली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. सणासुदीनंतर शहरात सुदैवाने नव्या रूग्णसंख्येत वाढ झाली नाही. मात्र, दुसरीकडे त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचीही टाळाटाळ सुरू आहे. सुमारे अडीच लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे. पण दुसरा डोस केवळ दीड ते पावणे दोन लाख़ लोकांनीच घेतला आहे. 86-87हजारजणांची दुसरा डोस घेण्याची तयारी नसल्याचे दिसते आहे. त्यांच्यासाठी मनपाने जनजागृती मोहीमही सुरू केली आहे.
मनपा प्रशासनाकडून लसीकरणावरही भर दिला आहे. मनपाच्यावतीने शहरात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. मध्यंतरी मनपाकडून मिशन कवच कुंडल मोहीम राबविली होती. या मोहिमेसही अल्प प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत अवघे 18 हजार नागरिकांनी लसीकरण केले. लसीकरण वाढविण्यावर मनपा प्रशासनाकडून भर दिला जात आहे. मात्र, अजूनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता या नागरिकांचे लसीकरण कसे करून घ्यावे, हा प्रशासनापुढील एक मोठा प्रश्‍न आहे.

वे निर्बंध जारी
ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीला मास्क बंधनकारक करण्यात आला असून यापुढे रूमालाला मास्क समजले जाणार नाही. रूमाल गुंडाळलेल्या व्यक्तींना दंडात्मक कारवाईला सामोर जावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना पाचशे ते पन्नास हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग तसेच करोनाच्या अन्य नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह आणि सभागृह आदी बंदिस्त जागेत एकूण जागेच्या 50 टक्के नागरिकांना प्रवेश, संपूर्ण खुल्या असलेल्या जागांमध्ये समारंभ अथवा संमेलन घेण्यासाठी फक्त 25 टक्के नागरिकांनाच परवानगी, असे नवे निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सीकरणाची नगरमधील स्थिती
एकूण लसीकरण-4,19,929, पहिला डोस- 2,53,386 व दुसरा डोस-1,66,543. यात फ्रंटलाईन वर्कर- पहिला डोस- 14,458 व दुसरा डोस- 11,371. तेराशे आरोग्य कर्मचारी अजूनही दुसर्‍या डोसविना आहेत. यात 1 हजार 363 आरोग्य कर्मचार्‍यांनी अजून करोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. 8 हजार 706 आरोग्य कर्मचार्‍यांनी पहिला डोस घेतला असून 7 हजार 343 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तीन दिवसांपासून गर्दी
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हायरसने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे शिथील केलेल्या निर्बंधावर फेरविचार सुरू झाला आहे. ठिकठिकाणच्या प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याचे आदेश आहेत. परदेशातून आलेल्यांवर विशेष नजर ठेवली जात आहे. त्यातील एक युएसए आणि एक युकेमधून नगरला आले आहेत. याची माहिती मिळताच महापालिकेने त्यांची कोरोना चाचणी केली. यामध्ये पहिल्या चाचणीत निगेटिव्ह टेस्ट आलेली आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्यांच्याही टेस्ट करण्यात आल्या असून, ते देखील निगेटिव्ह आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. त्यांच्याच घरात सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. सात दिवसांनी पुन्हा एकदा त्यांची टेस्ट घेण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ओमायक्रॉनच्या चर्चेमुळे लसीकरण केंद्रावरही गर्दी वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दीही ओसरली होती. प्रतिदिन शहरात बाराशे ते दीड हजारापर्यंत लसीकरण होत होते. मात्र ओमायक्रॉनच्या चर्चेमुळे दुपटीने लसीकरण वाढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसातील आकडा प्रतिदिन तीन हजारांवर गेला आहे.

COMMENTS