Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणिकपणे आणि माणुसकीने काम केल्याचे समाधान मोठे ः शंकरराव परदेशी

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेत कार्यालयीन काम करताना जो प्रामाणिकणा आणि माणुसकी जपली तोच जीवनप्रवास मनाला आनंद देतो, हेच खरे जगण्याचे समाधान आहे

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
ड्रोनद्वारे औषध फवारणीचे 24 मार्च रोजी प्रात्यक्षिक
ज्ञानशील कुटुंबासाठी प्रत्येक घरात छोटे पुस्तकालय असावे ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेत कार्यालयीन काम करताना जो प्रामाणिकणा आणि माणुसकी जपली तोच जीवनप्रवास मनाला आनंद देतो, हेच खरे जगण्याचे समाधान आहे, असे आत्मसमाधान रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार शंकरराव परदेशी यांनी व्यक्त केले.
   येथील अतिथी कॉलनीमध्ये असलेले85 वर्षाचे शंकरराव परदेशी यांच्या प्रांजळ सेवाभावाविषयी विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, स्नेहपरिवार ग्रुपतर्फे सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी शंकरराव परदेशी बोलत होते. आता वय खूप झाले असले तरी मनात समाधान आहे, मावळत्या सूर्याला कुणी महत्त्व देत नाही, सावल्या क्षीण झाल्या की माणसे लांब जातात पण खर्‍या प्रेमाची आणि सेवाभावी माणसे भेटतात, हाच खरा माणुसकीचा धागा आहे, आपलेपणाचा ओलावा आहे असे सांगून त्यांनी जे काम केले ते चोख केले आणि तेच जगण्याला अमृत देते असे उद्गार काढले. विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी शंकरराव परदेशी आणि सो. परदेशी यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार केला. स्नेहपरिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन परदेशी परिवाराचा सन्मान करून सर्वांनी शंकरराव परदेशी यांच्या प्रामाणिक कार्य काळातील ऋणात्मक आठवणी सांगितल्या. डॉ. उपाध्ये म्हणाले, माझ्या निराधार वाटेवर परदेशीसर आधार बनले. पोरक्या विद्यार्थ्यांना त्यांनी सदैव मायेचा ओलावा दिला. ते शिस्तबद्ध होते पण कर्मवीरांची विचारधारा त्यांनी जपली, अशी माणसे हीच खरी रयत ची ओळख होती तर सुकळेसर व प्राचार्य शेळके यांनी प्रशासकीय आपलेपणाच्या आठवणी सांगितल्या. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

COMMENTS