Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मनसेने अनधिकृत संबोधलेली पाम बीच मार्गावरील मजार अधिकृत असल्याचा समाजवादी पार्टीचा दावा

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील पामबीच मार्गाजवळ असलेल्या हजरत पीरसय्यद बाली शाहबाबा यांची मजार ही 439 वर्षाहून जुनी असल्याचा दावा समाजवा

पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
…तर नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे – संभाजीराजे छत्रपती
शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर ; आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील पामबीच मार्गाजवळ असलेल्या हजरत पीरसय्यद बाली शाहबाबा यांची मजार ही 439 वर्षाहून जुनी असल्याचा दावा समाजवादी पार्टीने केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेने सदर मजार अनधिकृत असल्याचा दावा करत त्यावर तोडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र नवी मुंबई शहर वसण्यापूर्वी पासून ही मजार असल्याचे सांगत दरवर्षी उरूस देखील साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर मनसे दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यात त्यांना यश येणार नाही अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टी कडून व्यक्त करण्यात आली.

COMMENTS