मुंबई ः मुंबई सेंट्रल स्थानकात झालेल्या डीरेलमेंटनंतर पश्चिम रेल्वेत आणखीन एक मोठा अपघात झाला आहे. लोकल ट्रेनचे कपलर तुटल्याने ट्रेन 2 भागांत वि
मुंबई ः मुंबई सेंट्रल स्थानकात झालेल्या डीरेलमेंटनंतर पश्चिम रेल्वेत आणखीन एक मोठा अपघात झाला आहे. लोकल ट्रेनचे कपलर तुटल्याने ट्रेन 2 भागांत विभागली गेली. ही घटना रविवारी सकाळी मरीन लाइन्स स्थानकात घडली.चर्चगेटहून बोरिवलीला जाणार्या लोकलचे कपलिंग तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी ही लोकल आता कारशेडला रवाना करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
अपघात झालेली लोकल चर्चगेटवरुन बोरिवलीला जाणारी होती. सकाळी 11 च्या सुमारास लोकल ट्रेन मरीन लाइन्स स्थानकात पोहचली होती. अशी विचित्र घटना झाल्याने प्रवासी गोधळले, सर्व प्रवाशांना खाली उतरून दुसर्या लोकलने जाण्यास सांगण्यात आले. आतमधून तुटलेल्या लोकलचे दोन्ही भाग कारशेडमध्ये नेण्यात येत आहेत. सर्व स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आणि लोकलचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात लोकलचे डबे एकमेकांपासून वेगळे झाले. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यानंतर लोकलचे वेगळे झालेले डबे आता रुळावरून हटवण्यात आल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झालीये. यापूर्वी लोकलचा असा अपघात 2003 मध्ये झाला होता. अपघाताच्या या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला जातोय. दर रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक घेतला जातो. यावेळी ट्रेन देखील कमी सोडल्या जातात. त्यावेळी मेगाब्लॉक असताना ट्रेनचं मेन्टेंन्स केलं जात नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
COMMENTS