गेवराई प्रतिनिधी - विद्यमान सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह सत्ताधार्यांना शेतकर्यांचे प्रश्न आणि विकासकामांशी कांही देणेघेणे राहीले नाही. शे

गेवराई प्रतिनिधी – विद्यमान सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह सत्ताधार्यांना शेतकर्यांचे प्रश्न आणि विकासकामांशी कांही देणेघेणे राहीले नाही. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या नुसत्या घोषणा केल्या. शेतकर्यांची सातत्याने फसवणूक करणार्यांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. नांदलगाव येथे 1 कोटी 21 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते. गेवराई तालुक्यातील मौजे नांदलगाव ग्रामपंचायत अंतर्गत 1 कोटी 21 लक्ष रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नांदलगाव क्र. 2 मध्ये सिमेंट रस्ता 30 लक्ष रुपये, नांदलगाव क्र .2 मध्ये सिमेंट रस्ता 5 लक्ष रुपये, मालेगाव येथे सिमेंट रस्ता 5 लक्ष रुपये, रामेश्वर येथे हायमॅक्स बसवणे दिवे 5 लक्ष रुपये, नांदलगाव क्र. 2 येथे मातोश्री पांदण रस्ता 1 कि.मी. 24 लक्ष रुपये, नांदलगाव क्र. 2 ते गिताराम कांदे यांच्या शेतापर्यंत 24 लक्ष रुपये, नांदलगाव क्र. 1 ते नांदलगाव क्र. 2 खडीकरण 24 लक्ष रुपये, फिल्टर प्लान्ट 4 लक्ष 78 हजार रुपये, जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आदी विकास कामांचा यात समावेश आहे. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती शाम मुळे, माजी प.स. सदस्य घनश्याम आबुज, दत्ता घवाडे, माजी सरपंच सुनील राऊत, सुभाष जगदाळे, राजेश वाघमोडे, डॉ. ज्ञानेश्वर आबुज, दामोधर चव्हाण, बाबासाहेब रडे, जुगलकिशोर रांदड, सरपंच योगेश गाडे, उपसरपंच जालिंदर घवाडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे, अनंत राऊत आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS