Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंदवली मेट्रो स्थानलगतचा रस्ता खचला

मुंबई: दहिसर-गुंदवली मेट्रो 7फ मार्गिकेवरील गुंदवली मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचला असून मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील एक प्रवेशद्वार, उद्वाहक आणि

जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी कक्षाचे उद्घाटन
वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज : मुख्यमंत्री फडणवीस
काळेंच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल : केदार

मुंबई: दहिसर-गुंदवली मेट्रो 7फ मार्गिकेवरील गुंदवली मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचला असून मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील एक प्रवेशद्वार, उद्वाहक आणि सरकता जिना प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. खचलेल्या रस्त्याची आयआयटीतील तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.
यासंदर्भात आयआयटीच्या तज्ज्ञांकडून उपाययोजनांबाबत शिफारसी करण्यात येणार असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील मागाठाणे मेट्रो स्थानकालगत सी. सी. आय. प्रोजेक्ट्स प्रा.लि. या विकासकाच्या रिव्हर्ली पार्क प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत खोदकाम करताना जमीन खचल्याची घटना मागील आठवड्यात घडली. मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार, सरकता जिना आणि उद्वाहकानजिकची जमीन खचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) तात्काळ प्रवेशद्वार, उद्वाहक आणि सरकता जिना प्रवाशांसाठी बंद केला. या घटनेनंतर विकासकाच्या कामाबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विकासकाला महानगरपालिकेने काम थांबविण्याचे आदेश दिले असून पोलिसही याप्रकरणी कारवाई करीत आहेत.

COMMENTS