केज । प्रतिनिधीकेज विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकासकामांचा वेग वाढत आहे

केज । प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकासकामांचा वेग वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून, जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून या रस्त्याची मागणी केली जात होती. आमदार नमिताताई मुंदडा यांनी विशेष पाठपुरावा करून कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, ज्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास गती मिळाली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जीवाचीवाडी आणि रानुबाईचीवाडी यांच्यातील अंतर सुलभ होणार आहे. शेतकरी आपल्या शेतमालाची वाहतूक सहज करू शकतील आणि स्थानिक बाजारपेठांशी संपर्क मजबूत होईल. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी संबंधित विभागाला कडक सूचना देण्यात आल्या असून, कामाची प्रत्यक्ष पाहणीदेखील नियमितपणे केली जात आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी मुख्य प्रवाहाशी जोडणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी रस्ता हा केवळ मार्ग नाही, तर या भागातील विकासाची जीवनवाहिनी ठरेल.रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रीराम कुटे, दादा चौरे फौजी, सिताराम चौरे, सर हानुमंत चौरे आणि इतर स्थानिक नागरिकांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचे दिलेला शब्द पाळणारी लोकप्रतिनिधी अशा शब्दांत आभार मानले आहेत. रखडलेल्या कामांना गती मिळाल्याने आता केज तालुक्याचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे.

COMMENTS