Homeताज्या बातम्यादेश

देशात कोरोनाचा धोका वाढला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढला असून, 24 तासांमध्ये 10 हजारापेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे. केंद्रीय आर

‘कपिल शर्मा’चा नवा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा
अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढला असून, 24 तासांमध्ये 10 हजारापेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात 24 तासामध्ये 11 हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी रुग्णांची संख्या 12 हजारांहून अधिक होती.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात आठ राज्यांना पत्र लिहिले असून यात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. कोरोना परिस्थितीवर अधिक लक्ष ठेवण्यासंदर्भात त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

COMMENTS