Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतिकारकांनी जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही : आ. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जे. डी. बापू यांच्यासह आपल्या क्रांतिकारकांनी उभ्या आयुष्यात कधीही जातीयवा

जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच
आरआयटीच्या एआयसीटीई आयडिया लॅबला 72 लाखांची देणगी
लसीचे दोन डोस घेणार्‍यांनाचा महाविद्यालयात प्रवेश : ना. उदय सामंत

इस्लामपूर / प्रतिनिधी : क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जे. डी. बापू यांच्यासह आपल्या क्रांतिकारकांनी उभ्या आयुष्यात कधीही जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही. त्यांनी लढायचे कसे, स्वाभिमानाने जगायचे कसे हे आपणास शिकविले. क्रांतिकारकांच्या विचारांचा हाच वारसा पुढे नेत आम्ही राज्यात निष्ठा आणि स्वाभिमानाचे राजकारण करत आहोत, अशी भावना असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही राज्यातील जनतेच्या ताकदीवर जातीयवादी शक्ती आणि धनशक्तीला पराभूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातील जाहीर सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी युवा उद्योजक अनिकेत पाटील यांनी पक्ष प्रवेश केला.
आ. पाटील म्हणाले, आपल्या क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि स्वातंत्र्यानंतरही सर्वसामान्य माणसांचे जीवन सुखी करण्यासाठी कष्ट घेतले. त्यांनी आयुष्य भर शिव-शाहू-फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा अंगीकार केला. याच विचाराने जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्यास मला आपण शक्ती द्या. या निवडणुकीत अपल्यासमोर बलाढ्य धनशक्ती आहे. मात्र, बहुजन समाजाचे हित आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज्यातील जनता आमच्या पाठीशी ताकद उभा करेल.
प्रकाश पाटील म्हणाले, विरोधक पैशाच्या जीवावर उड्या मारत आहेत. मात्र, आपल्या तालुक्यातील जनता त्यांना थारा देणार नाहीत. आ. जयंत पाटील कामाचा माणूस आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी ताकद उभा करू.
देवराज देशमुख म्हणाले, भाजपाने देशातील युवकांना वर्षाला 2 कोटी नोकर्‍या देतो, असे सांगत फसवणूक केली आहे. आमचा युवक त्यांना या निवडणुकीत धडा शिकवेल. संजय पाटील, दिनकर पाटील, सौ. नीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकास कामांचा आढावा मांडला. दिलीपराव देसाई, पै. गुलाबराव पाटील, अंजना पाटील, विजय दुर्गावळे, सुनिल पोळ, आबासाहेब पाटील, शहाजी पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित पाटील यांनी आभार मानले.

COMMENTS