Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा थंडीचे पुनरागमन

मुंबई : ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. आधीच दमट वातावरण असण

कर्जत-जामखेडच्या 158 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठणार
रिक्षाचालकांनी केला अवयव दानाचा संकल्प ; प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फाउंडेशनचा उपक्रम
काँगे्रसचा 5 न्याय आणि 25 गॅरंटीचा जाहीरनामा

मुंबई : ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. आधीच दमट वातावरण असणार्‍या मुंबईनगरीत तापमान अधिकच वाढल्यानं नागरिक उकाड्याने हैराण होत घामाने डबडबले होते. पण आता मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा थंडी सुरु झाली आहे. गेल्या 9 वर्षांतल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली आहे. मुंबईत किमान तापमान 20 अंशांपर्यंत घसरले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील आठवड्याच्या सुरुवातीला तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तरेकडून वाहणार्‍या थंड वार्‍यामुळे मुंबईसह नाशिक, पुण्यात येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ झाली होती. नाशिक शहरात पारा 9.4 अंशावर तर निफाड मध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

COMMENTS