कोपरगाव प्रतिनिधी -तालुक्यात ग्रामीण भागात अवैध धंदे आजही तेजीत सुरु आहे.या अवैध व्यवसायांनी गावाची शांतता भंग होते त्या अनुषंगाने पढेगावच्या ग्र
कोपरगाव प्रतिनिधी -तालुक्यात ग्रामीण भागात अवैध धंदे आजही तेजीत सुरु आहे.या अवैध व्यवसायांनी गावाची शांतता भंग होते त्या अनुषंगाने पढेगावच्या ग्रामसभेत सर्वानुमते गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला.
आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली ग्रामसभा आज दि.७ रोजी सरपंच मीनाताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामपंचायत सदस्यांत एकुण ६ महिला सदस्या आहे. परंतु त्यातील एकही सदस्या उपस्थित नसल्याने भानुदास शिंदे यांनी निषेधाचा ठराव मांडला. ७० लक्ष रुपयांची पाणी टाकीचे आणि पाईपलाईन योजनेचे काम सुरु झाले मात्र त्यात पाण्याचा स्रोत समाविष्ट नसल्याने नागरीकांनी अगोदर पाण्याचा स्रोत निर्माण करण्याची मागणी करुन, गाव सीसीटिव्हिच्या देखरेखीखाली आणण्याची सुचना मांडली. प्रत्येक कामाचे फलक, ड यादीचे वाचन, गाव अंतर्गत रस्त्यांची कामे, ग्रामसुरक्षा संदेशाचा ध्वनी कर्मचारी किंवा पदाधिकारी यांचाच असावा अशा विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न होऊन ग्रामसेवक बाबासाहेब गुंड यांनी विषयांचे वाचन केले शेवटी मोहन कर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS