Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमी पाटीलची मुख्य भूमिका असलेला ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली

मुंबई प्रतिनिधी -- नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीच्या 'घुंगरू' या सिनेमाच

गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ
अश्लीलतेची संस्कृती माजवणाऱ्या गौतमीला फडात नाचायला काय होते ?
गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी

मुंबई प्रतिनिधी — नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीच्या ‘घुंगरू’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील चालू राजकीय घडामोडींचा परिणाम गौतमी पाटीलच्या आगामी ‘घुंगरू’ या सिनेमावर झालेला दिसत आहे. गौतमीची मुख्य भूमिका असलेल्या ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ‘घुंगरू’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत बाबा गायकवाड म्हणाले,”काही कारणाने ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल

COMMENTS