Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रियांचे अधिकार विश्व हे असावे एकसंघ : कुसुम अलाम

अकोले : 'वैचारिक प्रदूषण थोपविणे आवश्यक असून, महिलांचा आत्मविश्वास टिकणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक तसेच सीमित अशा जखडलेल्या गुलामी मानसिकतेतून

विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी ः प्रा. बाबा खरात
अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे

अकोले : ‘वैचारिक प्रदूषण थोपविणे आवश्यक असून, महिलांचा आत्मविश्वास टिकणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक तसेच सीमित अशा जखडलेल्या गुलामी मानसिकतेतून स्त्रियांची मुक्तता मोलाची ठरेल. स्त्रियांचे जग अर्थात अधिकार विश्व हे एकसंघ असावे असे प्रतिपादन लेखिका आणि ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या कुसुम अलाम यांनी केले.

 निमगाव सावा, ता. जुन्नर येथील दिलीप वळसे पाटील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित ‘महिला सक्षमीकरण : वर्तमान स्थिती, आव्हाने आणि संधी’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रातील बीजभाषण प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पवार होते. यावेळी त्या बोलत होत्या.

महिला शक्ति आणि सक्षमीकरणाचे वास्तव अधिक विस्ताराने मांडताना अलाम पुढे म्हणाल्या, ‘शेती, मातृसत्ताक व्यवस्था अशा स्थित्यंतरातून बळकट मनोवस्थेतील स्री प्रत्यक्षात मात्र चुलीतल्या पारंपरिक दास्यत्वातच अडकली अन् अडकवली गेली. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा मोठेपणा सांगताना त्यांच्या विचारांचे आचरण आणि वैचारिक धाक स्वीकारायला हवेत. आर्थिक महासत्ता हिंसेतून नाही उदयाला येत. स्त्रियांच्या अनुभवाचं शहाणपण समाजमन घडवते.

प्राचार्य डॉ. भास्कर शेळके म्हणाले, ‘ स्त्रियांच्या संदर्भात पुरुषप्रधान व्यवस्थेने मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्रीचे संस्कार समाजाला मार्गदर्शक राहिले आहे. संस्कार संस्कृती घडवतात.  स्रीला विकासकार्यात संधी मिळणे हा तिचा हक्क आहे.

 डॉ . सुनील शिंदे म्हणाले क्रांतीबा महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी पुण्याबाहेरील महाराष्ट्रातला स्त्रीशिक्षणाच्या विस्ताराचा पहिला प्रयोग जुन्नर तालुक्यातून ओतूरमधील मुलींच्या शालेय शिक्षणाच्या माध्यमातून प्रभावीपणे केला. शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि मुहूर्तमेढ ओतूरमधील प्रयोगशील उपक्रमातून विस्तारली. 

अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या हस्ते निमगाव सावा परिसरातील विविध क्षेत्रातील उपक्रमशील महिलांचा सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ. छाया तांबे, स्मिता कणसे, धनश्री कोळगे,  प्रा. विशाल हासे, डॉ. सुनील घनकुटे, डॉ.अरुणा वाघोले, डॉ.सुलभा गुंजाळ, डॉ. स्मिता निचित, डॉ. कुंदा कवडे, प्रा. प्रणिता सदावर्ते आदींसह  मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS