Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाने उडवली बाजारकरूंची धांदल

भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला गेला पावसात वाहून

राहाता ः गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राहाता शहर व परिसरात गुरुवारी दुपारनंतर साडेचारच्या सुमारास काही वेळ झालेल्या पावसाने शेतकर्‍य

भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन
कोपरगाव तहसील कार्यालयात 6 लाखाचा अपहार
टीईटी घोटाळ्यात नगर जिल्ह्यातील 149 शिक्षक

राहाता ः गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राहाता शहर व परिसरात गुरुवारी दुपारनंतर साडेचारच्या सुमारास काही वेळ झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा दिला तर बाजारात असलेले बाजारकरू व दुकानदार यांची मात्र पावसाने चांगलीच धांदल उडवून टाकली. जिकडे-तिकडे चोहीकडे पाणीच पाणी. सगळीकडे अशी अवस्था बाजार तळावर अनुभवास मिळत होती. मुसळधार पाऊस असल्याने प्रत्येकाची मोठी धांदल उडाली. आपला माल झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची मोठी लगबग दिसली. मात्र वरून मालावर झाकण व खालील मालात पाणी अशी परिस्थिती झाल्याने भाजीपाला किराणा यास अनेक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. फळबाजी विक्रेते भेळ विक्रेते याचबरोबर बाजारात असलेल्या सर्वच विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे पावसाने भिजून नुकसान झाले. त्याची मोठी आर्थिक झळ विक्रेत्यांना सोसावी लागणार आहे. त्याचबरोबर बाजारकरूना सुद्धा पावसाचा चांगलाच फटका बसला. बाजार करूंनी मोठ्या खर्चाने विक्रीसाठी भाजीपाला फळे किराणा साहित्य सकाळी मोंढ्यावर खरेदी केले होते, त्यावर बर्‍यापैकी पाणी फिरले. डोक्यावर छत असावे आपण भिजू नये म्हणून बाजारात असलेल्या महिला पुरुष खरेदीदारांनी प्रत्येक पालाखाली आसरा घेतला होता. अनेकजण बाजार करून पावसात भिजावे लागले बाजार करू व शेतकरी तसेच नागरिक यांनी पावसाचे स्वागत करताना दिसले आम्ही कितीही भिजलो अथवा नुकसान झाले तरी पाऊस होणे खूप गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बाजारकरू देत होते या पावसाने संपूर्ण बाजारतळ धुवून निघाले क्षणात पावसाने जोरदार सरी बरसून सर्वांना आनंदी केले आहे.

शेतकरी सुखावला मात्र भाजीपाल्यांचे नुकसान – बळीराजासह नागरिक शेतकरी विक्रेते सर्वच पावसाच्या प्रतीक्षेत होते. शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या होत्या. पीक हाताशी यावे म्हणून शेतकरी वरूण राजाकडे रोज प्रार्थना करत होता. अखेर गुरुवारी दुपारनंतर राहाता शहरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने बाजारकरूंची अक्षरशः धांदल उडाली. वर छत असूनही अनेकांच्या मालाचे नुकसान झाले, मात्र आमचे नुकसान झाले तरी चालेल ते नुकसान आम्ही सहन करू परंतु पाऊस पडला पाहिजे असे म्हणून भाजी विक्रेते पंकज शिंदे व लसूण विक्रेते विलास उदमले यांनी या पावसाचे जोरदार स्वागत केले.

COMMENTS