कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा विकास हा तेथील पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे किती मोठया प्रमाणावर विणले आहे, त्यावरुन विकासाचा अंदाज नोंदवला जातो.
कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा विकास हा तेथील पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे किती मोठया प्रमाणावर विणले आहे, त्यावरुन विकासाचा अंदाज नोंदवला जातो. परदेशात जेव्हा भारतीय लोक जातात, तेव्हा तिथल्या चकाचक, आणि रस्त्यावर एकही खड्डा नसल्यामुळे होणारा सुलभ आणि सहज प्रवासाची सर्वांनाच भुरळ पडते. अशीच भुरळ अलीकडे भारतातीला काही रस्त्यांची पडतांना दिसून येत आहे. नुकताच रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली, आणि हा सुखद धक्का सर्वांनीच अनुभवला. तब्बल 180 किमी वेगाने गाडया धावत होत्या, आणि रस्त्याच्या दुर्तफा असलेले नागरिक हा वेग अनुभवत होते. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा हा 710 किमीचा समृद्धी महामार्ग केवळ 6 तासात गाठता येणार आहे.
विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस या दोन मुख्यमंत्र्यांनी या समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले आणि ते आपापल्या कारकिर्दीत विशिष्ट टप्प्यांवर पूर्णत्वास आणले. विलासरावांनी मुख्यमंत्री असताना या महामार्गाची कल्पना पहिल्यांदा मांडली आणि ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर मार्गी लावली आणि उपमुख्यमंत्री असतांना प्रत्यक्षात आणली.
समृद्धी महामार्ग 710 किमीचा असल्यामुळे या प्रवासात तब्बल 10 पेक्षा अधिक जिल्हे जोडले जात आहे. त्यामुळे या महार्मावर हजारो लोकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईवरुन नागपूरला जाण्यासाठी 17 तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. मात्र आता हेच अंतर केवळ केवळ सहा-सात तासात कापता येणार आहे. त्यामुळे विकासाचा वेग आपल्याला कायम राखता येणार आहे. तसेच प्रवास सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग हा 3 अभयारण्यातून जाणार आहे. काटेपूर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी अंडरपासची देखील सोय करण्यात आली आहे. असे एकूण 209 अंडरपास समृद्धी महामार्गवर आहेत. हे देखील या प्रकल्पाचे एक वैशिष्टयच म्हणावे लागेल. ट्राफिक सर्व्हिलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्री टेलिफोन बुथ प्रत्येक 5 कि.मी. अंतरावर असणार आहे. तसेच या संपूर्ण महामार्गावरुन येणार्या जाणार्यांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे साहजिकच लाखो रेाजगार निर्माण होणार आहे. हॉटेल्य व्यवसाय, खाद्यपदार्थांची विक्री, गाडयांच्या देखभालीसाठी शोरुम्स, पोलिस, सुरक्षा व्यवस्थापक या सर्वांची वर्दळ या महामार्गावर असणार आहे. देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे, कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी 11 लाख वृक्ष असणार आहे. तर राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे.
या प्रकल्पासाठी 55 हजार 355 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. महामार्गाला राज्यातील 14 जिल्हे पोर्टने जोडले जाणार आहेत. प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार आहेत. महामार्गामुळे शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा 20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार आहे. 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार आहे. या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात 1000 नवीन शेततळी उभारले जाणार आहेत. या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे. सर्वाधिक गतीने पूर्ण भूसंपादन या महामार्गावर झाले. 8800 हेक्टर जागा ही सर्वाधिक गतीने भूसंपादन करण्यात आली. अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन करण्यात आली. यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले. या महामार्गात 400 वाहनांसाठी व 300 पादचार्यांसाठी विशेष जागा देण्यात आली आहे. यामुळे महामार्गाला जोडताना स्थानिक वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, कारण झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा देशातील पहिलाच महामार्ग ठरणार असे म्हटले जात आहे. हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार व तो स्वयंचलित असणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ति दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा विकासाला गती देणारा आणि लाखो जणांना रोजगार देणारा ठरणार आहे.
COMMENTS