Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकुलाच्या पात्र लाभार्थीना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थीना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू झाली असून तालुक्य

विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग
मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : विरोधी पक्ष नेते दरेकर यांची मागणी
आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थीना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू झाली असून तालुक्यातील लाभार्थ्यांनी मागणी अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत घरकुल मिळालेल्या पात्र लाभार्थीना 5 ब्रास वाळू मोफत देणेबाबत शासन निर्णय झाला असून पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल मंजुर झालेली आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या या लाभार्थी यांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. याबाबत शासनाकडून दुहेरी हातभार लावला जात असून संबंधित नागरिक यांचे जीवनमान सुकर होण्यासाठी त्यांच्या घर बांधकामासाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे.
यासाठी संबंधित लाभार्थी यांनी तहसील कार्यालयात अर्ज केले नंतर त्यांचा अर्ज गौण खनिज पोर्टलवर नोंद केला जातो. सदर अर्जदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ने नेमून दिलेल्या ई-सेवा केंद्रमध्ये जाऊन शुन्य रॉयल्टी असलेली पावती प्राप्त करून घेऊन वाळू डेपोमध्ये देणेची आहे.
पाटण तालुक्यात आतापर्यंत 172 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी परिपूर्ण 154 अर्ज पोर्टलवर नोंदणी केले आहेत. 18 अर्जदारांना त्रुटी पूर्तता पत्र दिले आहे.

COMMENTS