Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

शिर्डी ः शिर्डी विधानसभा मतदारसंघातील 270 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सोमवार 6 मे रोजी सुरूवात झाली. मतदान यंत्र

सुभाषराव सोनवणे यांचे निधन
वाळू पकडायला गेले आणि दमदाटी अनुभवली
जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनीस भेट

शिर्डी ः शिर्डी विधानसभा मतदारसंघातील 270 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सोमवार 6 मे रोजी सुरूवात झाली. मतदान यंत्रे तयार करण्याचे हे काम निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचनानुसार अतिशय काटेकोरपणे करण्यात येत आहे.
यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात वीस उमेदवार निवडणूक लढत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्राबरोबर प्रत्येकी दोन इलेक्ट्रॉनिक्स बॅलेट पेपर वापरावे लागणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघात 1708 मतदान केंद्र आहेत. या विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्राची जुळणी/मतदान यंत्रे तयार करण्याचे काम मागील दोन दिवसापासून त्या त्या विधानसभा मतदानसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सुरू आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात 270 मतदान केंद्र आहेत. यासाठी मतदान यंत्रे जुळणी करण्याचे राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे सुरू झाले. ही प्रक्रीया दोन दिवस चालणार आहे. यासाठी 21 टेबलवर प्रत्येकी 6 अधिकारी/कर्मचारी असे एकूण 106 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या देखरेखाली ही मतदान यंत्रे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोर मोरे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS