Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर

लातूर प्रतिनिधी - शहरात दररोज 170 टन ओला व सुका कचरा निघतो. त्याची विल्हेवाट कशी लावली जाते हा विषय जितका गंभीर आहे तितकाच किंवा त्यापेक्षाही गंभ

सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली
कोल्हापुरात तिघांचा बुडून मृत्यू
माणिक मेटकर जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त

लातूर प्रतिनिधी – शहरात दररोज 170 टन ओला व सुका कचरा निघतो. त्याची विल्हेवाट कशी लावली जाते हा विषय जितका गंभीर आहे तितकाच किंवा त्यापेक्षाही गंभीर म्हणजे शहरातील घातक कचरा आहे. दररोज सुमारे 1 टन घातक कचरा निघतो. महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून ओला व सुक्या कच-यावर कशीबशी प्रक्रिया केली जात असली तरी घातक कच-याचा प्रश्न मात्र अद्यापही अधांतरीच आहे. घातक कच-याचे संकलन करणे व त्यावर प्रक्रिया करण्याबाबतची कसलीही यंत्रणा महानगरपालिकेकडे सध्या तरी नाही. घातक कच-याचे संकलन करुन त्यावर प्रक्रिया करणा-या एकाही एजन्सीसोबत महानगरपालिकेचे टायअप झालेले नाही. त्यामुळे शहरातील दररोजच्या 1 टन घातक कच-याचे होते काय?, या प्रश्नाचे उत्तर संबंधीत यंत्रणेकडे नाही.
वैद्यकीय सेवा, सुविधांच्या दृष्टीने लातूर शहर प्रगत शहर म्हणून सर्वदुर सुप्रसिद्ध आहे. लहानातल्या लहान शस्त्रक्रियेपासून ते अतिश्य गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असोत की, गंभीर आजारावर केले जाणारे उपचार असोत हे लातूर शहरात होत असल्यामूळे लातूर जिल्हाच नव्हेतर आसपाच्या जिल्ह्यांतून आणि महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक सीमाभागातूनही लातूर शहरात असंख्य रुग्ण येतात. शहरात तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांच्या अद्ययावत रुग्णालयांची संख्या खुप मोठी आहे. या रुग्णालयांतून निघाणारा दररोजचा घातक कचरा त्यात इंजेक्शनच्या सुया, सलाईनच्या बाटल्या, बीटी सेट, इंजेक्शनच्या बाटल्या आदींचा समावेश असतो. शहरातील सर्वच रुग्णालयातून या घातक कच-याचे संकलन केले जाते. तो घातक कचरा शहरातीलच एक खाजगी एजन्सी संकलीत करुन एमआयडीसीतील कारखान्यात त्या कच-याची विल्हेवाट लावली जाते. परंतू, लातूर शहर महानगरपालिकेकडे घातक कच-यावर प्रक्रिया करणारी अशी कुठलीही यंत्रणा सध्या तरी नाही. लातूर शहर महानगरपालिका ही शहराची पालक संस्था आहे. या संस्थेमार्फत नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल केले जातात. त्यामुळे या संस्थेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा, सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. परंतू, असे होताना दिसून येत नाही. शहरात सर्वत्र कचराच कचरा दिसून येतो. दररोज कचरा संकलीत केला जात असेल तर रस्त्यांवर पडणारा कचरा येतो कोठुन?, हा खरा प्रश्न आहे.

COMMENTS