पुणे/प्रतिनधी : राज्यात मान्सूनचा पाऊस अद्याप आला नसून, शेतकरी पावसाची वाट चातकासारखी पाहतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचे दर देखील कड
पुणे/प्रतिनधी : राज्यात मान्सूनचा पाऊस अद्याप आला नसून, शेतकरी पावसाची वाट चातकासारखी पाहतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचे दर देखील कडाडल्याचे समोर आले आहे. मान्सूनअभावी नवीन भाजीपाला घेण्यास विलंब होणार असून, उष्णतेच्या लाटेमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.
सध्या बाजारात सुरू असलेली भाजीपाल्याची आवक ही भिलाई, रायपूर, दुर्ग, पंढरपूर, नाशिक, बेंगळुरू, संगमनेर या भागांतून सर्वाधिक आहे. विविध प्रकारच्या भाज्या या भागांतून येत आहेत. त्यातल्या सध्या टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो 60 रुपयांपर्यंत गेला आहे. नागपूर: वाढलेल्या उन्हाळ्याचा परिणाम भाजीपाला बाजारावर दिसून येत आहे. उन्हाळ्यात स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत आहे. परिणामत: भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. तसेच कोथिंबिर, टोमॅटो, हिरवी मिरची या रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये वापरण्यात येणार्या घटकांचे दरदेखील वधारल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात सुरू असलेली भाजीपाल्याची आवक ही भिलाई, रायपूर, दुर्ग, पंढरपूर, नाशिक, बेंगळुरू, संगमनेर या भागांतून सर्वाधिक आहे. विविध प्रकारच्या भाज्या या भागांतून येत आहेत. त्यातल्या सध्या टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो 60 रुपयांपर्यंत गेला आहे. बेंगळुरू येथील मगनपल्ली येथून टोमॅटोची आवक होत असून स्थानिक माल येण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत बुलडाणा, औरंगाबाद येथून भाजीपाल्याची आवक सुरू होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती महात्मा फुले सब्जी-फ्रुट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली. वाढलेला उन्हाळा पाहता स्थानिक माल येण्यास विलंब होणार असून पावसाळ्यातदेखील गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरीपूजन दरम्यान भाजीपाल्याचे दर अधिक राहणार असल्याचे सांगितले जाते.
मान्सून लांबल्याने आवक घटली – सध्या वाढलेल्या उन्हाळ्याचा परिणाम तसेच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. बाजारात भाजीपाल्याची अवाक देखील घटली आहे. यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर हे वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिर 40 रुपये जुडी तर टोमॅटो 50 ते 60 रुपये किलो दराने विकले जात आहे. यासोबतच हिरवी मिरची आणि फळभाज्यांचे भवबदेखील वधारले आहेत. या मुळे सर्व सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याचे चित्र आहे.
COMMENTS